चंद्रपूर - शिकारीसाठी लावण्यात आलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श होऊन दोन बिबटे, दोन अस्वल आणि एका हरणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना भद्रावती वनपरिक्षेत्रातील आयुधनिर्माणी टाईप सेक्टर २ परिसरात घडली. या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.आयुध निर्माणीचे सुरक्षा अधिकारी आर.एम. ढुमने यांना सेक्टर २ परिसरात बिबट मृतावस्थेत पडून असल्याचे दिसले. त्यांनी पुन्हा परिसराची पाहणी केली असता आणखी एक बिबट, दोन अस्वल आणि एक हरीणही मृतावस्थेत आढळले. तिथे शिकारीसाठी जिवंत विद्युत तारा सोडल्याचे दिसून आले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असून ही घटना तीन दिवसांपूर्वीच घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
विद्युत तारेला स्पर्श होऊन दोन बिबटे, दोन अस्वल व हरणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 3:27 PM