ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील शहीद हेमंत करकरे इंग्लिश स्कूलचे संचालक व्यंकट गिरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले आहे. या चिठ्ठीत दोन शिक्षकांसह एका शिक्षिकेवर हा आरोप आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी कलम १०६ अन्वये दोन शिक्षकांना शुक्रवारी सकाळी अटक केली, तर शिक्षिकेचा शोध सुरू असल्याची माहिती रामनगरचे ठाणेदार दीपक गोतमारे यांनी दिली. रामराव पवार (३२) रा. घुग्घुस व संदीप पिंपळखेडे (३२) रा. तुकुम चंद्रपूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. तर शश्मीता कांबळे या शिक्षिकेचा शोध सुरू आहे. शहीद हेमंत करकरे इंग्लिश स्कूल ही शाळा पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी चालविण्यात येते. व्यंकट गिरी हे या शाळेचे संचालक होते. गुरुवारी दाताळा पुलाजवळ त्यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळली.
दोन शिक्षकांना अटक, शिक्षिकेचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 1:09 AM
येथील शहीद हेमंत करकरे इंग्लिश स्कूलचे संचालक व्यंकट गिरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले आहे. या चिठ्ठीत दोन शिक्षकांसह एका शिक्षिकेवर हा आरोप आहे.
ठळक मुद्देतीन दिवसांचा पीसीआर : व्यंकट गिरी यांना आत्महत्येस केले प्रवृत्त