शहरं
Join us  
Trending Stories
1
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ शिक्षकांसह १२ जण जागीच ठार
2
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
3
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
4
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
5
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
6
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
7
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
8
घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलं, मुलगी झाली... तरीही पहिल्या पतीकडून घेतली पोटगी, सरकारी योजनेने केला भांडाफोड
9
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
10
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
11
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
12
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
13
केवळ २ वर्ष आपल्या कमाईवर वापरा ६७:३३ चा फॉर्म्युला; कठीण काळात कोणाकडे मदत मागावी लागणार नाही
14
Miss Universe India 2024: गुजरातच्या रिया सिंघाने पटकावला खिताब, १८ व्या वर्षीच मिळवला मान
15
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
16
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
17
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
18
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
19
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
20
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू

होळीच्या पर्वावर दोन हजार पोलिसांचा पहारा

By admin | Published: March 20, 2016 12:50 AM

दारूशिवाय धुळवड, असे समिकरणच जुळत नाही. त्यातच चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने मागील वर्षीप्रमाणेच यंदाही मद्यप्रेमींची चांगलीच गोची होणार आहे.

दारू तस्करीच्या विरोधात कसली कंबर : जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आदेशचंद्रपूर : दारूशिवाय धुळवड, असे समिकरणच जुळत नाही. त्यातच चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने मागील वर्षीप्रमाणेच यंदाही मद्यप्रेमींची चांगलीच गोची होणार आहे. पुढील आठवड्यात होळीसह अनेक सणोत्सव असल्याने परजिल्ह्यातून चंद्रपुरात दारूची मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी याविरुद्ध आतापासूनच फिल्डींग लावली आहे. होळीच्या पर्वावर जवळपासून दोन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी दारू तस्करी व मद्यपींवर करडी नजर ठेवणार आहेत. यासाठी सोमवारपासून पोलीस यंत्रणेकडून विशेष मोहिम राबविली जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी शनिवारी जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी व ठाणेदारांची विशेष बैठक घेऊन अवैध दारू तस्करीच्याविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. या विशेष मोहिमेचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत हे करणार असून या मोहिमेअंतर्गत कायदा व सुव्यवस्था, दारू विक्रेते, व मद्यपी यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासोबतच येत्या २१ मार्च रोजी जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीचे आयोजनही करण्यात आले (प्रतिनिधी)१८ ठिकाणी नाकेबंदीजिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी झाली. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा जिवाचे रान करीत असतानाही पोलिसांचा डोळा चुकवून जिल्ह्यात छुप्या मार्गाने दारू आणली जात आहे. त्यातच होळीचा सण असल्याने मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात १८ ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे. सोबतच एक विशेष कारवाई पथकही गस्त घालणार आहे. या काळात कुणी मद्यप्राशन करून वाहन चालविताना दिसल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाणार असून यासाठी प्रत्येक वाहनधारकांची मशीनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. दारू विक्रेते परांगदाहोळीच्या पर्वात पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या धसक्याने शहरातील अनेक दारू विक्रेते शहरातून परांगदा झाले आहेत. त्यामुळे मद्यपींची चांगलीच गोची झाली आहे. काही मद्यपींनी अगोदरच होळीची ‘सोय’ करून ठेवल्याची चर्चा आहे.