लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाघिणीला मिळविण्यासाठी दोन वाघात चांगलीच झुंज झाली. हा प्रकार नवेगाव-रामदेगी राखीव क्षेत्रात सोमवारी घडला. विशेष म्हणजे, पर्यटकांनाही वाघाची ही झुंज पाहता आली. या झुंजीचा व्हीडीओ सोशल मीडियावर वायरल झाला.वनपरिक्षेत्र अधिकारी बफर कार्यालय खडसंगी अंतर्गत येणाऱ्या नवेगाव-रामदेगी प्रवेशद्वारातून नागपुरातील काही पर्यटक जंगल सफारीसाठी सोमवारी दाखल झाले होते. दरम्यान जोगामोगा वनपरिसरात त्यांना एकत्र तीन वाघांची साइडिंग झाली. याच दरम्यान दोन वाघांत कडक्यांची झुंज सुद्धा अनुभयास मिळाली. वाघिणीला मिळविण्यासाठी वाघाची ही झुंज सुरू होती. हा सर्व प्रकार एका पर्यटकाने कॅमेऱ्यात कैद केला असून त्याचा व्हीडीयो सोशल मीडियावर वायरल होत आहे. या दोन वाघात सुमारे ६ मिनिटे जोरदार झुंज झाली असून यात दोन्ही वाघ किरकोळ जखमी झाल्याची माहितीही एका पर्यटकाने दिली.१ जुलै रोजी मी नवेगाव गेटमधून बफरझोन क्षेत्रात भ्रमंती करीत गेलो होतो. रस्त्यावरच तीन वाघ दिसले. त्यानंतर दोन वाघांमध्ये जोरदार झुंज झाली. अनेक पर्यटकांना हा प्रकार अनुभवायला मिळाला.-सौरव कुरवे,पर्यटक, चिमूर.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीसाठी दोन वाघांची झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:31 PM
वाघिणीला मिळविण्यासाठी दोन वाघात चांगलीच झुंज झाली. हा प्रकार नवेगाव-रामदेगी राखीव क्षेत्रात सोमवारी घडला. विशेष म्हणजे, पर्यटकांनाही वाघाची ही झुंज पाहता आली.
ठळक मुद्देराखीव क्षेत्रातील घटना