शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

युवकांनीच पकडले दोन ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 11:48 PM

रेतीची तस्करी करणारे दोन हायवा ट्रक येथील काही युवकांनी पकडून उपविभागीय कार्यालयात जमा केल्याने खळबळ उडाली. मात्र रेती तस्करांनी आपले हायवा ट्रक उपविभागीय कार्यालय परिसरातून परस्पर घेऊन गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देरेतीची तस्करी : उपविभागीय कार्यालयात केले जमा

आॅनलाईन लोकमतमूल : रेतीची तस्करी करणारे दोन हायवा ट्रक येथील काही युवकांनी पकडून उपविभागीय कार्यालयात जमा केल्याने खळबळ उडाली. मात्र रेती तस्करांनी आपले हायवा ट्रक उपविभागीय कार्यालय परिसरातून परस्पर घेऊन गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मूल तालुक्यातून रेती वाहतुक करणारे दोन हायवा ट्रक गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास काही युवकांनी तहसील कार्यालयासमोर पकडले. त्यानंतर हायवा ट्रक तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आले. शुक्रवारी हायवा मालकांकडून उपविभागीय अधिकारी यांनी माहिती घेतली असता रेती वाहतुकीची टिपी मोहर्ली उसेगांव (चामोर्शी) घाटावरची आहे. मात्र यावर इनवाईस नंबर नसल्याने याबाबत चौकशी करून, यात गैर आढळल्यास वाहने जमा करू, असे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी सांगितले. हायवा मालकांना हायवा जमा करण्याचे आदेश दिल्याने हायवा उपविभागीय कार्यालयात जमा करण्यात आले.सूर्यास्तापूर्वी आणि सुर्योदयानंतर रेती उत्खनन करता येत नाही. असे असताना नियमबाह्य रेती वाहतूक केली जात असल्याची चर्चा आहे. पर्यावरण विभागाने रेती उत्खननासाठी अनेक अटी लादल्या आहेत. मात्र त्याचे पालन केले जात नाही.रेती तस्करी थांबवामूल तालुक्यातून रेती कंत्राटदार नियमबाह्य पध्दतीने रेती उपसा व वाहतूक करीत असल्याने यावर आळा घालावा, अशी मागणी श्रमिक एल्गारने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. मागील वर्षीही मोठया प्रमाणावर रेती तस्करी झाली. याबाबत श्रमिक एल्गारने स्थानिक पातळीवर व मंत्रालयात पुराव्यासह तक्रार केली होती. विभागीय आयुक्तांनी यावर जिल्हाधिकारी यांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेशही दिले होते. मात्र रेती तस्कर व या विभागाचे मधुर संबध, यामुळे या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही, असेही श्रमिक एल्गारने म्हटले आहे.