राजकुमार चुनारकरचंद्रपूर : वन्यप्राणी व मानव यांच्यातील संघर्षं टाळण्यासाठी वाघाचे घर मानव विरहीत करण्याची संकल्पना शासनाने राबविली. त्या दृष्टीने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्यातील कोअर झोनमध्ये वसलेल्या रामदेगी व जामनी या गावांचे पुनर्वसन सन २०१४ मध्ये करण्यात आले आहे. हे पुनर्वसन तत्कालीन वने, पुनर्वसन व मदत कार्य मंत्री स्व.पतंगराव कदम यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. रामदेगी व जामणी या गावात येऊन त्यांनी ग्रामस्थांना लॅन्ड व्हॅल्यूचे धनादेश दिले होते.वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाची संख्या मोठया प्रमाणात आहे. तसेच पर्यटकांना हमखास वाघाचे दर्शन होत असल्याने देश-विदेशातील पर्यटकांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची भूरळ पडली आहे.जंगलाच्या राजाच्या घरात काही प्रमाणात मानवाने केलेले अतिक्रमण काढण्यासाठी व मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने ताडोबा कोअर झोनमध्ये वसलेल्या रामदेगी व जामणी गावाचे पुनर्वसन करण्याची योजना तयार केली होती. मात्र या पुनर्वसन योजनेला गती देण्याचे काम तत्कालीन वने तथा पुनर्वसन मदत कार्य मंत्री पतंगराव कदम यांनी केले होते. तसेच वाघाची होणारी शिकार, यावर आळा घालण्यासाठी व वाघाच्या सुरक्षेसाठी टायगर प्रोटेक्शन स्कॉडचीसुद्धा निर्मिती करुन वाघांना व वन्यप्राण्यांना संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले होते. रामदेगी वं जामणी गावाच्या पुनर्वसनासाठी पतंगराव कदम यांनी २८ नोव्हेबर २०११ ला गावात येऊन गावकºयांसह बैठक घेतली होती. नोटीफिकेशन जारी केले. त्यानंतर लॅन्ड व्हॅल्यूचे धनादेश स्वत: ग्रामस्थांना दिले होते. यावेळी त्यांनी मुख्य वन सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह रामदेगी व जामणी जाऊन प्रत्येक नागरिकांशी संवाद साधला होता व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. पतंगराव कदम यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने पुनर्वसित रामदेगी व जामणी येथील गावकऱ्यांनी त्यांच्या स्मृतीस उजाळा दिला.
पतंगराव कदमांच्या आठवणीने गहिवरली ताडोबातील दोन गावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 2:12 PM
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्यातील कोअर झोनमध्ये वसलेल्या रामदेगी व जामनी या गावांचे पुनर्वसन सन २०१४ मध्ये करण्यात आले आहे. हे पुनर्वसन तत्कालीन वने, पुनर्वसन व मदत कार्य मंत्री स्व.पतंगराव कदम यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.
ठळक मुद्देपतंगराव कदमांच्या आठवणींना उजाळाटायगर प्रोटेक्शन स्कॉडचीही निर्मिती