शहरं
Join us  
Trending Stories
1
जय शाहंची ऐतिहासिक घोषणा! IPL खेळणाऱ्यांना 'बोनस', कराराच्या रकमेव्यतिरिक्त लाखोंचा वर्षाव
2
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
4
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
5
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
6
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
7
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
8
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
9
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
10
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
11
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
12
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
13
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
14
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
15
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
16
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
17
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
18
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
19
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
20
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित

दोन वर्षीय ‘युग’ दोन दिवसांपासून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:19 AM

तालुक्यातील खंडाळा येथील दोन वर्षीय युग अशोक मेश्राम हा मुलगा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. बुधवारी दुपारपासून तो अचानक गायब झाला. गुरुवारीही त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देअपहरणाचा संशय : पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : तालुक्यातील खंडाळा येथील दोन वर्षीय युग अशोक मेश्राम हा मुलगा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. बुधवारी दुपारपासून तो अचानक गायब झाला. गुरुवारीही त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र उपयोग झाला नाही. या घटनेने संपूर्ण गाव भयभीत झाले आहे. सदर घटनेची तक्रार बुधवारी रात्रीच ब्रह्मपुरी पोलिसात केली आहे.खंडाळा गाव ब्रह्मपुरीपासून तीन किमी अंतरावर आहे. गावातीलच एका चौकात युग बुधवारी दुपारी खेळत होता. सुमारे ४ वाजताच्या दरम्यान तो अचानक गायब झाला. सायंकाळी कुटुंबीयांना यूग कुठेच दिसून आला नाही. लगेच त्यांनी व गावकऱ्यांनी शोधाशोध सुरु केली. अख्खा गाव पालथा घातला. रात्र होऊनही युगचा पत्ता लागला नाही. अखेर रात्री उशिरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार करण्यात आली आहे.ते वाहन कुणाचे ?काही लहान मुलांच्या तोतड्या सांगण्यानुसार गावात नवीन नंबरची मोठी गाडी आली होती. गाडीत बसणारे दोन व्यक्ती आजूबाजूला पाहत होते. त्यांनीच युगचे अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. युगच्या बेपत्ता होण्याने संपूर्ण गाव भयभीत झाले आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण चौकशी केली व युगच्या शोधकार्याला सुरुवात केली आहे..

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिस