रवी रणदिवे ब्रह्मपुरीदसरा हा देवीचा सण आहे. देवी ही शक्तीची देवता आहे. यासाठी अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीचे आवाहन करुन रामनवमीप्रमाणे नऊ दिवस उदापूर येथे भजन, पूजन व कीर्तन केले जाते. शांततेचे पूजन आपल्या गावाच्या शिवेबाहेर जाऊन केले जाते. गावाप्रमाणेच गावाबाहेर ही शांतता राखून जिकडे- तिकडे सुखसमृद्धी आणू, असा या मागचा अर्थ प्राप्त झाल्याने स्वत: समवेत इतरांचाही विचार करण्यास शिकविणारा असा हा उदापूरचा दसरा परिसरात नावलौकीकास आला आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील जवळच्या हाकेवर असलेले उदापूर हे गाव. पारंपारिक दसरा उत्सवामुळे हे गाव ब्रह्मपुरी तालुक्यात प्रसिध्द झाले आहे. १०० वर्षापूर्वीची ही परंपरा अजूनही या गावात कायम आहे. गावात दुसरा कोणताही सण एवढ्या उत्साहात आणि व्यापक स्वरुपात होत नसेल. मात्र दसरा संपूर्ण गाव मिळून साजरा करतात. दसऱ्याचे दुसरे नाव विजयादशमी आहे. अधर्म विरुद्ध धर्म यांच्या युध्दात धर्माचा विजय झाला, हे सांगणारा हा सण. एरवी ब्रह्मपुरीकर घराच्या बाहेर पडत नसतात. परंतु ब्रह्मपुरीकर दसऱ्याला मात्र सीमाल्लंघन करुन उदापूरच्या दसऱ्याला हजेरी लावीत असतात. गावात मुख्य चौकामध्ये हनुमानाचे मंदिर असून या दिवशी हजारो लोक एका रांगेत उभे राहून आपट्याची पाने अर्पण करून दर्शन घेत असतात. तेथेच बाजूला रावणाची प्रतिमा तयार करुन ठेवली असते. या प्रतिमेला मोठ्या वाजतगाजत गावातून फिरवून दहनस्थळी नेले जाते. काही जण राम, लक्ष्मण, हनुमान यांची वेशभुषा साकारलेले असतात. शेवटी धनुष्यबाणाच्या सहाय्याने रावण दहन केले जाते. रावणाचे दहन झाल्यानंतर सर्व नागरिक घरी जाऊन परस्परांना आपट्याची पाने सोने म्हणून देत असतात.आपट्याच्या पानाचे महत्त्वआपट्याची पाने घरी ठेवल्यास घरातील वायुमंडळ शुद्ध होते. आपट्याच्या पानाचे आदानप्रदान करण्याचे कारण हेच आहे की, आपट्याच्या पानातून तळहाताकडे तेजत्व संक्रमित होऊन ऊर्जा देत असते, असे सांगितले जाते.
इतरांचाही विचार करण्यास शिकविणारा ‘उदापूरचा दसरा’
By admin | Published: October 11, 2016 12:48 AM