रत्नाकर चटप ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या रेती घाटांची लिलाव प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. यात जिल्ह्यातील एकूण ४८ घाटांपैकी २९ घाटांचा लिलाव दोन टप्प्यात करण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यात एकूण ३६ रेतीघाटांपैकी २४ तर दुसऱ्या टप्प्यात १२ घाटांपैकी पाच घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यामुळे आता रितसर रेतीवाहतूक करता येणार असून बांधकामाच्या कामाला वेग येणार आहे. खासगी बांधकामाबरोबर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका तसेच शासकीय विकास कामे रेती नसल्याने प्रलंबित होती. अनेक ग्रामपंचायतीमध्ये विकास निधी असून कामे करता येत नसल्याची बोंबही ग्रामीण स्तरावर होती. याला आता पूर्णविराम मिळाला असून लवकरच रेतीचे खनन सुरु होऊन रेती खरेदी करता येणार आहे. काही कामांची अंदाजपत्रके गेल्या सहा ते सात महिन्यांपासून तयार करुन ती धूळ खात पडल्याचे चित्र दिसते. याला मुख्य कारण रेती असल्याचे समजते. यातच काही ग्रामपंचायत, नगरपालिकांनी काळ्या रेतीचा वापर करुन कामे केली खरी. परंतु अनेकदा झालेल्या तक्रारींमुळे ही कामे अर्धवट राहिली आहे. खासगी बांधकामासाठी ट्रॅक्टरने अवैधरित्या रेती वाहतूकही मोठ्या करण्यात आली आहे. अशा अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर चालकांना लाखोंचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे रेतीपुरवठा अणि खनन सर्वत्र बंद असल्याचे दिसत होते, रेतीघाट लिलावाआधी छत्तीसगडमधील लाल रेतीने काही बांधकामे करण्यात आली. परंतु लाल रेतीचा खर्च बांधकामधारकांना परवडणारा नसल्याने याकडे नंतर पाठ फिरविण्यात आली. आता मात्र बांधकामाला वेग येणार आहे.महागडा घाटजिल्ह्यातील खासगी रेती पुरवठाधारकांना घेतलेल्या ४८ घाटांपैकी वरोरा तालुक्यातील सोईट घाट सर्वाधिक महागडा गेलेला आहे. सदर घाटाचा लिलाव एक कोटी ५९ लाखात झाला असल्याची माहिती आहे.असे आहेत जिल्ह्यातील रेतीघाटबल्लारपूर तालुका : दुधोली- वर्धा नदी, पळसगाव नाला, कोर्टी तुकूम- नाला, गोंडपिपरी तालुका : आर्वी-१ वर्धा नदी, हिवरा-१ हिवरानाला, हिवरा- २ नाला, धाबा ४, धाबा नाला, आर्वी- २ वर्धा नदी, भद्रावती : कुनाडा- वर्धा नदी, पिपरी (दे.) वर्धा नदी, राळेगाव रिट- १ वर्धा नदी, जनेनेवली नाला, राळेगाव रिठ- २ वर्धा नदी, राळेगाव रिठ ३ वर्धा नदी, आष्टा - ईरई नदी, चंदनखेडा - ईरइ नदी, चिमूर : दापका हेटी नाला, शिरपूर गोदनी नदी, कोसंबी रिठ-हत्तीगोल, गोंदेडा- १ उमा नदी, गोंदेडा- २ उमा नदी, सोनगाव गावंडे- उमा नदी, उसेगाव उमा नदी, सिंदेवाही : लालबोडी- बोकडडोह, सरांडी बोकडडोह ब्रह्मपुरी तालुका : रणमोचन - वैनगंगा नदी, सोदरी- वैनगंगा नदी नागभीड तालुका : वाढोणा - बोकडडोह, राजुरा तालुका : नलफडी नाला कोरपना तालुका : रायपूर पैनगंगा नदी, तामसी रिठ पैनगंगा नदी, कोडशी रिठ पैगंगा नदी. वरोरा : तुलाना-१ वर्धा नदी, करंजी वर्धा नदी, सोईट वर्धा नदी, बोरी वर्धा नदी.
अखेर २९ रेतीघाटांचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:30 PM
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या रेती घाटांची लिलाव प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. यात जिल्ह्यातील एकूण ४८ घाटांपैकी २९ घाटांचा लिलाव दोन टप्प्यात करण्यात आला आहे.
ठळक मुद्देएकूण ४८ घाट : आता प्रलंबित असलेल्या बांधकामांना येणार वेग