फोटो
भद्रावती : भद्रावती स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत कायम ठेवून ओबीसींची जनगणना केंद्र झालीच पाहिजे, असे केंद्र व राज्य सरकारला माळी महासंघ तालुका शाखा भद्रावतीच्या वतीने तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य एन.एस. कोकोडे, नागपूर विभागीय सचिव माजी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ओबीसीचे आरक्षण पूर्ववत कायम करावे व ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना भद्रावती येथील तालुका शाखेचे किशोर खंडाळकर, अनिल बगडे, महेश कांबळे, सुरेंद्र राऊत, राजेश नागलकर, रितेश निंबाळकर, राजेश फुटाणे, सुनीता खंडाळकर, रजनी कांबळे, सोनू चौधरी, नेहा बगडे, श्रुतिका जुनघरे, कांचन लंगडे उपस्थित होते.
===Photopath===
300621\img-20210629-wa0048.jpg
===Caption===
स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत कायम करा