बँक व्यवस्थापकांचीच मर्जी : पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरजसावली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशिक्षित बेरोजगारासाठी मुद्रा लोन योजना सुरू केली. ही योजना चांगली असल्याने अनेक बेरोजगारांनी मुद्रा लोनसाठी बँकांकडे अर्ज केले. पण बँक व्यवस्थापकांनी आपल्या ओळखीचे व मर्जीतील लोकांना कर्ज देऊन गरजू बेरोजगारावर अन्याय केल्याचे अनेक प्रकरण समोर येत आहेत.मुद्रा लोन ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. यात ५० हजार ते १० लाखांपर्यंत अर्ज दिल्या जाते. कागदपत्रे कमी, जमानतदारची अट नाही, त्यामुळे लहान मोठा व्यवसाय करू इच्छिणारे अनेक युवकांनी अर्ज केले. पण म्हणतात ना शासनाची चांगली योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतच नाही. ज्या युवकांना खरी गरज आहे, त्यांना डावलून ज्यांच्याकडे आधिच मोठमोठे धंदे आहेत, व्यवसाय आहेत त्यांच्या कुटुंबातील लोकांनाच प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप गरजवंत युवकांनी केला आहे.गोरगरीब युवक जे भाजीपाला, चहाटपरी, नाश्ता दुकान, फेरीवाले, ऊस, आईस्क्रीम, सायकल दुरुस्तीे, फळविक्री, झेरॉक्स, थंडपेय आदी लहान व्यवसाय टाकून आपला रोजगार निवडून कुटुंबाला हातभार लावू इच्छितात. पण त्यांना ५० ते एक लाखाचेही कर्ज मिळत नाही, असे दुर्दैव आहे.या उलट आधीच मोठा व्यवसाय थाटून बसणाऱ्यांना १० लाखांचे कर्ज मिळते. याकडे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष द्यावे, जेणेकरुन शासनाची चांगली योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल आणि योजनेची यशस्विता दिसेल अन्यथा इतर योजनांसारखी अवस्था होईल. (शहर प्रतिनिधी)
मुद्रा लोन योजनेपासून बेरोजगार वंचित
By admin | Published: May 29, 2016 1:06 AM