शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

नोकरभरती बंदीने बेरोजगार निराश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:27 AM

ब्रह्मपुरी : शासनातील विविध विभागांमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकर भरतीवर सरकारने बंदी घातली आहे. ग्रामीण भागात हजारो विद्यार्थी ...

ब्रह्मपुरी : शासनातील विविध विभागांमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकर भरतीवर सरकारने बंदी घातली आहे. ग्रामीण भागात हजारो विद्यार्थी पदवीधर होत आहेत. परंतु, कनिष्ठ पदे भरण्यासंदर्भात शासनाने भूमिका घेतली नाही. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले. युवक-युवतींमध्ये प्रचंड निराशा निर्माण झाली आहे.

प्रवासी निवारा बांधण्याची मागणी

चिमूर : शंकरपूर, ब्रह्मपुरी, कान्पा येथे जाण्यासाठी फाट्यावर यावे लागते. या फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने या परिसरातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना रस्त्यात राहून बसची वाट बघावी लागते. त्यामुळे या ठिकाणी प्रवासी निवाऱ्याची मागणी होत आहे.

तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी

ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरूस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे.

रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

कोरपना : तालुक्यातील अनेक गावांची व गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची कित्येक वर्षे लोटूनही अवस्था जैसे थे आहे. या रस्त्याचे भाग्य उजळणार कधी, असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे. आवारपूर, लोणी आदी गावाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

हातपंप दुरुस्तीकडे लक्ष द्यावे

नागभीड : तालुक्यातील अनेक गावांचे हातपंप नादुरुस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असून, विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे बंद हातपंप दुरुस्तीसाठी पथक पाठविणे अत्यावश्यक झाले आहे.

अल्ट्राटेक चौकात गतिरोधक उभारा

गडचांदूर : गडचांदूर शहरातून राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. या मार्गावरून दिवसरात्र वाहतूक सुरू असते. मात्र गतिरोधक नसल्याने येथे अपघात होत आहेत.

बाजारपेठेत स्वच्छतागृहाची मागणी

राजुरा : राजुरा शहरातील भाजी मार्केटमध्ये मुत्रीघर आहे. परंतु या ठिकाणी मोठी गर्दी असते. त्यामुळे उईके चौक येथील बाजार पेठेजवळ स्वच्छतागृह बनविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नगर परिषद, राजुरा यांच्याकडे मागणी केली आहे.

भारोसा घाटावर पुलाची निर्मिती करा

नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील भारोसा घाटावरून तीर्थक्षेत्र वढा व जुगादला जाण्यासाठी पुलांची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. या ठिकाणी पुलाची निर्मिती झाल्यास जाण्या- येण्यासाठी सोयीचे होईल.

जंगली प्राण्यांची गावाकडे धाव

चिमूर : तालुक्यातील काही गावातील शेतशिवारात जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे जंगली प्राणी पाण्याच्या शोधात शेतशिवारात येत आहेत. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सिंचन सुविधा उपलब्ध करा

पोंभुर्णा : तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्यामुळे ते दुबार पिकांपासून वंचित आहेत. त्यामुळे तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, धान उत्पादनासाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी मोठे नुकसान झाले आहे.

बेरोजगारांमध्ये नैराश्य

वरोरा : परिसरात मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार असून त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते नैराश्यात सापडले आहेत. त्यामुळे या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी परिसरात उद्योगाची निर्मिती करावी, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे.