लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील पाच वर्षांपासून शासकीय नोकरभरती रखडली आहे. परिणामी बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेली नोकर भरती त्वरीत सुरु करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.भाजपा सरकारने मोठ्या प्रमाणात नोकर भरती करु असे आश्वासन देऊन केंद्रात व राज्यात सत्ता संपादित केली. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची भरती केली नाही. तसेच दरम्यानच्या काळात महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून काही प्रमाणात भरती राबवली. मात्र या पोर्टलवर असलेल्या त्रुटी व अडचणीमुळे अनेक भरती प्रक्रीया प्रलंबित आहेत. अनेक विभागाच्या परीक्षांचे निकाल लागून नियुक्ती देण्यात आली नाही. तर अनेकजण कोर्टामध्ये गेले होते. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या युवकांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. त्यामुळे नव्या सरकारने रखडलेली भरती प्रकीया राबवावी, तसेच त्रुट्या असलेल्या पोर्टल बंद करावे, अशी मागणी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन देणाºया शिष्टमंडळात मुन्ना गेडाम, मुकेश मेश्राम, सचिन कुकुडकार, मोहसीन शेख, कादर शेख, किशोर भाकरे यांच्यासह चंद्रपुरातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाºया युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नोकरभरती रखडल्याने बेरोजगारीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 5:00 AM
मागील पाच वर्षांपासून शासकीय नोकरभरती रखडली आहे. परिणामी बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेली नोकर भरती त्वरीत सुरु करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. भाजपा सरकारने मोठ्या प्रमाणात नोकर भरती करु असे आश्वासन देऊन केंद्रात व राज्यात सत्ता संपादित केली. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची भरती केली नाही.
ठळक मुद्देभरती घेण्याची मागणी : बेरोजगारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन