लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मागील काही दिवसांपासून ब्रम्हपुरीच्या तापमानात सात्यत्याने वाढ होत आहे. यावर्षी तापमानाचा पारा ४७ अंशावर पोहचला आहे. प्रचंड उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. परिणामी अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती दुपारच्यावेळी ब्रह्मपुरीमध्ये बघायला मिळत आहे.जगाच्या नकाशावर तापमानाच्या बाबतीत ब्रम्हपुरचे नाव कोरल्या गेले आहे. वाढत्या तापमानाची कारणे काय असू शकतात, याबाबत कर्तवितर्क लागले जात असले तरी, ब्रम्हपुरीचे हवामान केंद्रावरच अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.या कारणाला आधारही तसाच आहे. ३० एप्रिलला सिंदेवाही येथील कृषी विभागाने घेतलेले सिंदेवाहीचे तापमान ४२.७ होते. त्याचवेळी ब्रम्हपुरीचे तापमान ४७.० एवढे होते. १ मेला ब्रम्हपुरीचे तापमान ४७.१ होते तर सिंदेवाहीचे तापमान ४३.४ होते. ब्रम्हपुरी व सिंदेवाहीचे अंतर ४५ किमी आहे. अक्षाशीय अंतरावरून लक्षात घेतल्यास हे दोन्ही ठिकाण २० डिग्री ३६ मिनिट उत्तर ब्रम्हपुरी तर २० डिग्री १७ मिनिट उत्तर सिंदेवाही असे आहे. या दोन ठिकाणामधील अक्षाशीय अंतरात फक्त १९ मिनिटांचा फरक आहे. परंतु तापमानात मात्र तीन ते चार डिग्री फरक जाणवत आहे, हे शक्य असू शकते का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ब्रम्हपुरीचे हवामान केंद्र बदलुन दुसऱ्या ठिकाणी हलविणे गरजेचे आहे.ब्रम्हपुरीचे हवामान केंद्र ज्या ठिकाणी आहे, ती जागा चारही बाजूने वेढलेली आहे. त्यामुळे हवेचे अभिसरण होत नसल्याने सतत तापमानात वाढ होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ब्रम्हपुरीचे तापमान सतत जास्त दाखविले जात आहे. जंगलाने वेढलेला आणि प्रदूषण नसलेला हा भाग असल्याने येथे जास्त तापमान वाढण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील भीरा या अशाच चुकीचे तापमान दाखविणाºया केंद्रात हवामान खात्याने सुधारणा केल्या आणि आज तेथील तापमान कमी आहे. तसेच ब्रम्हपुरी येथीलही केंद्र बदलावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.ब्रम्हपुरीचे हवामान केंद्र आज ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण योग्य नाही. त्यामुळे चुकीचे तापमान नोंदविले जात आहे. सदर केंद्र बदलविणे आवश्यक आहे. याबाबत आपण हवामान खात्याकडे तक्रार केली आहे.-सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक तथा सदस्य,केंद्रीय पर्यावरण मंत्रालय दिल्ली
ब्रह्मपुरीत अघोषित संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 12:18 AM
मागील काही दिवसांपासून ब्रम्हपुरीच्या तापमानात सात्यत्याने वाढ होत आहे. यावर्षी तापमानाचा पारा ४७ अंशावर पोहचला आहे. प्रचंड उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. परिणामी अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती दुपारच्यावेळी ब्रह्मपुरीमध्ये बघायला मिळत आहे.
ठळक मुद्देतापमानात वाढ : हवामान केंद्राची जागा बदलण्याची मागणी