लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. सदी खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अस्वस्थता दिसून येत आहे. मात्र नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्स्ािंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या २५० च्या जवळपास पोहचली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी केवळ सावली तालुका वगळला तर १४ तालुक्यातही रुग्ण आढळले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच खरीप हंगामाच्या कामाने वेग घेतल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. त्यातच पावसाळ्यात ताप, सर्दी आदींचे रुग्ण आढळून येत आहे. त्यातच कोरोना संसर्गाची वाढती साखळी यामुळे ग्रामीण भागात अस्वस्था पसरल्याचे दिसून येत आहे. मात्र नागरिकांनी न घाबरता प्रशासनांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, तसेच ताप सर्दी, कोरडा खोकला, श्वा घेण्यासाठी त्रास होणे, अशक्तपणा जाणविल्यास दवाखान्यात संपर्क साधावा. त्यासोबतच कुणीही रेडझोनमधून किंवा परजिल्ह्यातून गावात किंवा शहरात प्रवेश करीत असेल तर त्यांनी स्वत:हून याबाबतची माहिती आरोग्य विभागाला द्यावी, तसेच तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. र्ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था, तंटामुक्त समिती, आशा स्वयंसेविका, पोलीस पाटील प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. त्यांना बाहेरुन येणाºयांनी माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, आवश्यक काम असेल तरच मास्क लावून घराबाहेर पडावे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. परजिल्ह्यातून किंवा रेडझोनमधून येणाºयांनी स्वत:ची तपासणी करुन घ्यावी, लक्षणे आढळताच संबंधित परिसरातील आरोग्य विभागाला माहिती द्यावी.- निवृत्ती राठोड, शल्य चिकित्सक,जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर
कोरोनामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 5:00 AM
चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या २५० च्या जवळपास पोहचली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी केवळ सावली तालुका वगळला तर १४ तालुक्यातही रुग्ण आढळले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच खरीप हंगामाच्या कामाने वेग घेतल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे.
ठळक मुद्देरुग्ण वाढल्याने चिंता । प्रशासनाच्या नियमांचे पालन करा