घुग्घुस : वेकोलि वणी
क्षेत्राच्या अप्पर महाव्यवस्थापक (प्राचालन) कार्यालय अधिक तर सायंकाळी महाव्यवस्थापक कार्यालयात वेळ देतात. दरम्यान युनियन नेते व कार्यालयीन वरिष्ठ अधिकारी चर्चा करीत असतात. मात्र या कार्यालयात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याने सर्वसाधारण लोकांना त्या कार्यालयात ये-जा करणे कठीण झाले आहे.
वेकोलि वणी क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक ऊर्जाग्राम (ताडाळी) येथे कार्यालय असले तरी घुग्घुसच्या अप्पर महाव्यवस्थापक कार्यालयांतर्गत घुग्घुस,नायगाव,निलजई, मुंगोली, कोलगाव व पैनगंगा कोळसा खाण (उपक्षेत्रीय) कारभार या कार्यालयातून चालत असतो. घुग्घुस उपक्षेत्रीय व्यवस्थापकाचे काम कंट्रोलिंग होते. दररोज सायंकाळी ५ नंतर या कार्यालयात अप्पर महाव्यवस्थापक बसून कारभार हाताळत असतात. याच कार्यालयात विविध युनियन प्रतिनिधींशी चर्चा व कार्यालयीन वरिष्ठ विविध विभागाचे अधिकारी संबंधित कामकाज,चर्चा करीत असतात. मात्र त्या कार्यालयाच्या बाजूलाच वेकोलिचे अंतरिम दूरभाष केंद्र आहे. समोरील वऱ्हाड्यांत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्याचप्रमाणे सुरक्षा विभागाचे कार्यालय आहे. मात्र तिथे पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही. दुसऱ्या बाजूला बिल्डिंगमधून सिव्हिलचे कार्यालय व कोळसा विक्री कार्यालय आहे.या क्षेत्रातील स्कूल बसेस व इतर वाहने उभी असतात. अशा महत्त्वाच्या कार्यालय परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा कर्मचारी दिसून आला नाही. सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावरच असल्याचे दिसून येते