शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

शिकारीसाठी विद्युत तारांचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 6:00 AM

अगदी महिनाभराच्या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत वीज तारांचा वापर करून एका वाघाची शिकार करण्यात आली. स्थानिक शिकारी अथवा शिकारी टोळ्या जंगलातून जाणाºया उच्च दाब वीज वाहिन्यांचा वापर करून तारांचे जाळे पसरवत छोटया जनावरांना लक्ष्य करीत असतात. मात्र, या तारांच्या संपर्कात वाघ-बिबटे-अस्वल यासारखे संरक्षित प्राणीदेखील येण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात ब्रह्मपुरी येथे अशाच प्रकारे वाघाची शिकार उघडकीस आली होती.

ठळक मुद्देवनविभाग गंभीर : कारवाईसाठी दोनशे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात प्रवाही विद्युत तारांचा शिकारीसाठी वापर होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हा आहे. वाघ, बिबट यांच्यासह शेकडो जातीचे वन्यप्राणी चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या वनक्षेत्रातील गावांमध्ये शिकारी टोळी अथवा स्थानिक असामाजिक तत्वांच्या माध्यमातून जिवंत वीज तारांचा वापर करुन वन्यजीवांच्या शिकारीचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. या शिकारीच्या जाळात अडकून आता वाघ, बिबट आणि मोठी जनावरेदेखील मृत्युमुखी पडत आहेत. याबाबत वनविभाग आता गंभीर झाले आहे. सदर प्रकार टाळण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेत दोनशे कर्मचाऱ्यांना या संदर्भात प्रशिक्षण दिले आहे.अगदी महिनाभराच्या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत वीज तारांचा वापर करून एका वाघाची शिकार करण्यात आली. स्थानिक शिकारी अथवा शिकारी टोळ्या जंगलातून जाणाऱ्या उच्च दाब वीज वाहिन्यांचा वापर करून तारांचे जाळे पसरवत छोटया जनावरांना लक्ष्य करीत असतात. मात्र, या तारांच्या संपर्कात वाघ-बिबटे-अस्वल यासारखे संरक्षित प्राणीदेखील येण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात ब्रह्मपुरी येथे अशाच प्रकारे वाघाची शिकार उघडकीस आली होती.भद्रावती तालुक्यातील केंद्रीय आयुध निर्माणीच्या जंगलात बिबट आणि अस्वलाच्या जोडयांनादेखील प्राण गमवावा लागला होता. वनविभागाने या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत. वनविभागाचे अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी याखेरीज वीज केंद्र आणि आयुध निर्माणी यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची एक संयुक्त कार्यशाळा चंद्रपुरात पार पडली. कार्यशाळेत सुमारे दोनशे वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. जंगल भागात शिकार रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना नेमके प्रशिक्षण आणि घटनांच्या नोंदी ठेवण्यासोबतच छोटयात छोटी अनुचित घटनादेखील समन्वय अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. चंद्रपूर मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी विविध सूचना दिल्या. यासोबतच डब्ल्युपीएसआय, नागपूरचे संचालक नितीन देसाई, उदय पटेल, बंडू धोतरे, महवितरणचे अभियंता देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.पायदळ गस्त आवश्यकआपल्या शेताच्या आसपास फिरणाऱ्या आणि पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्यजीवांना मारण्याकडे शेतकºयांचा कल असतो. याशिवाय दहशत पसरवणारे वाघ-बिबटे-अस्वल देखील स्थानिक शेतकऱ्यांचे शत्रू ठरतात. यामुळेच पीक वाचवण्यासाठी सौर कुंपणाच्या योजनांची अंमलबजावणी आणि पायदळ प्रत्यक्ष गस्त आवश्यक असल्याचे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. आगामी काळात जंगल भागातून असलेल्या वीज वाहिन्यांच्या बिघाडाची माहिती वनविभागाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती ठरणार आहे. त्यामुळेच या भागात अधिक समन्वय राखणे काळाची गरज बनली आहे, असे मत चंद्रपूरचे मानद वन्यजीवरक्षक बंडू धोतरे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :forest departmentवनविभाग