हिवाळ्यामध्ये व्हायरल फ्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असतात. मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे सर्दी, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. अद्यापही त्यावर लस भेटली नसल्याने केवळ मास्क घालूनच कोरोनाला प्रतिबंध करता येवू शकतो, असे आरोग्य विभागाने सुचविले आहे. परंतु, मास्क घालून बाहेर पडत असल्याने हवेद्वारे आत जाणारे विषाणू रोखण्यास मदत होत आहे. याचा दुहेरी फायदा होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात असणाऱ्या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. त्यामुळे चंद्रपूर देशात कुप्रसिद्ध आहे. कंपनीमधून निघणारा धूर हवेतून श्वसनाद्धारे जात असून आरोग्याच्या समस्या भेडासावण्याची शक्यता असते. मात्र आता मास्कचा वापर नियमित करण्यात येत असल्याने कोरोनासह अन्य रोग टाळण्यास मदत होत आहे.
मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळा
एकाच गावात राहणाऱ्या बऱ्याच लोकांना जेव्हा एकच आजार होतो. त्याला साथीचे आजार म्हटल्या जाते. आजार झालेला रुग्ण दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास साधारणता साथीचे आजार होत असतात. यामध्ये इन्फ्ल्यूएन्झा, कांजिण्या, चिकनगुणिया, टायफाईड, डांग्या खोकला, डेंग्यू या आजाराचा समावेश आहे. मात्र मास्कच्या वापराने याला आळा बसत आहे.
विषाणूजन्य आजार
वातावरणातील बदलामुळे साधारणता व्हायरल फ्यू मोठ्या प्रमाणात होत असतो. तसेच टीबी, निमोनिया, सारी आदी विषाणूजन्य आजारामध्ये येत असतात. मात्र आता कोरोनामुळे अनेकांचे विनाकारण घराबाहेर पडते बंद आहे. तसेच सतत मास्क घालत असल्याने विषाणूचा प्रसार होण्यास बाधा येत असल्याने रुग्णांची संख्या घटत आहे.
कोट
मास्कच्या सततच्या वापरामुळे हवेतून पसरणाऱ्या आजाराची संख्या कमी झाली आहे. मात्र घरातील परिसरात अस्वच्छता असेल किंवा दूषित पाण्याचा वापर होत असल्यास विषाणूजन्य आजार जळू शकतात. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विषाणूजन्य आजाराचे रुग्ण आढळून येण्याच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.
-निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकीत्सक