लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सामान्य जनतेमध्ये पारंपारिक पद्धतीने काम करणारी प्रशासन व्यवस्था रुजली आहे. त्यामुळे आॅनलाईन व्यवस्थेकडे सेवा हक्क कायदयाच्यामार्फत सर्व सामान्य जनतेला वळविताना या कायद्याचे फायदे, येणारे अडथळे व ही यंत्रणा पूर्णता कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात बदलणारे प्रशासन याबाबतची माहिती सर्वसामान्य जनतेला झाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये त्यांनी लोकसेवा हक्क आयोगाच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची प्रत्येक कार्यालयात कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाते, याबाबतचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सुरुवातीला सादरीकरण केले.जिल्ह्यांमध्ये वरोºयापासून सुरू झालेल्या लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीने गेल्या दोन वर्षात जिल्ह्यामध्ये प्रशासकीय सेवा प्रदान करताना झालेले बदल व आलेल्या अडचणी याबाबतची मांडणी केली. यानंतर प्रत्येक विभागाने सेवा हक्क आयोगाच्या निर्देशाप्रमाणे काम करताना नागरिकांना सुविधा देताना येत असलेल्या अडचणी बाबतही माहिती दिली. तर विविध विभागांच्या आॅनलाईन अंमलबजावणीमध्ये येणाºया अडचणीबाबत आयुक्तांनी बैठकीमध्ये माहिती जाणून घेतली.५०० सेवांची सुविधा मिळणारलोकसेवा हक्क कायद्यान्वये आगामी काळात ५०० सेवांची सुविधा सामान्य नागरिकांना प्रत्येक केंद्रावर दिली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २२ लाख लोकांना जवळपास १ हजार केंद्राच्या माध्यमातून विविध सुविधा पोहोचविल्या जातात. यामध्ये सेतू केंद्र, सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र यांचा समावेश आहे.
सेवा हक्क कायद्याचा वापर सर्वसामान्यांमध्ये रुजवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 9:59 PM
सामान्य जनतेमध्ये पारंपारिक पद्धतीने काम करणारी प्रशासन व्यवस्था रुजली आहे. त्यामुळे आॅनलाईन व्यवस्थेकडे सेवा हक्क कायदयाच्यामार्फत सर्व सामान्य जनतेला वळविताना या कायद्याचे फायदे, येणारे अडथळे व ही यंत्रणा पूर्णता कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात बदलणारे प्रशासन याबाबतची माहिती सर्वसामान्य जनतेला झाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.
ठळक मुद्देस्वाधीन क्षत्रिय : जिल्हाधिकारी कार्यालयात विभागप्रमुखांचा आढावा