पी. व्ही. शेंडे : शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमसिंदेवाही : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित अधिक उत्पादन देणाऱ्या धान बियाण्याचा शेतकऱ्यांनी वापर करावा, असे आवाहन सिंदेवाही येथील कृषी संशोधन केंद्राचे संशोधन संचालन डॉ. पी. व्ही. शेंडे यांनी देलनवाडी येथील शेतकरी प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना केले.प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी व कृषिमित्र प्रशांत बोरकर यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून कृषी मित्र सुखदेव येवनकर उपस्थित होते. सर्वप्रथम प्रशिक्षणाचे प्रास्ताविक संशोधन सहयोगी ए.ए. नागदेवे यांनी केले. याप्रसंगी डॉ. लोखंडे यांनी शेतकऱ्यांना फळ शेती, फुल शेती व भाजीपाला लागवड तसेच प्रा. मांडवडे यांनी शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ए.ए. नागदेवे तर डी.एम. गणवीर यांनी मानले. कार्यक्रमाला जे.जी. भिसे, विश्वनाथ झोडे, सी.ए. गहाणे, संदीप मेश्राम, सुभाष निकुरे व गावातील शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
विद्यापीठ निर्मित धान बियाणे वापरावे
By admin | Published: February 05, 2017 12:40 AM