शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
4
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
5
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
6
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
7
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
8
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
9
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
10
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
11
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
12
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
13
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
14
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
15
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
16
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
17
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
18
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
19
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
20
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले

काॅन्टॅक्ट लेन्स वापरताय, काळजी न घेतल्यास होऊ शकते इजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:31 AM

चंद्रपूर : मागील काही वर्षांपासून चष्म्याऐवजी काॅन्टॅक्ट लेन्स वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र लेन्स वापरताना पुरेशी काळजी न घेतल्यास ...

चंद्रपूर : मागील काही वर्षांपासून चष्म्याऐवजी काॅन्टॅक्ट लेन्स वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र लेन्स वापरताना पुरेशी काळजी न घेतल्यास जंतुसंसर्ग होऊन डोळ्यांसाठी महागात पडू शकते. त्यामुळे योग्य पद्धतीने आणि डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच लेन्स वापरणे गरजेचे आहे.

सध्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण लेन्स वापरू लागले आहेत. चष्मा म्हटला की, अनेकांना तो नकाेसा वाटतो. मात्र चष्मा लागल्यानंतर त्याला टाळताही येत नाही. चष्मा वापरण्याशिवाय पर्याय नसल्याने काही जण काॅन्टॅक्ट लेन्स वापरतात. मात्र खूप काळजी घेणे महत्त्वाचे आहे, नाहीतर जीवावरही बेतू शकते.

बाॅक्स

चष्म्याला करा बाय बाय

अनेकांना चष्म्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. चष्मा आहे म्हणून विवाहात अडथळा येतो, असा अनेकांचा अनुभव आहे.

काॅन्टॅक्ट लेन्समुळे चष्म्यापासून सुटका मिळू शकते. लेन्स डोळ्याच्या आत असल्यामुळे बाहेरून दिसत नाही. त्यामुळे लेन्स वापरण्याकडे विशेषत: तरुणांचा समावेश अधिक आहे.

कोट

नेत्रतज्ज्ञ म्हणतात...

ज्यांना चष्मा लागलेला आहे त्यांनी चष्म्याचा वापर नियमित करावा. काॅन्टॅक्ट लेन्स वापरताना डाॅक्टरांचा वेळोवेळी सल्ला घ्यावा. लेन्स वापरताना अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. रात्री झोपताना लेन्सचा वापर करू नये.

- डाॅ. चेतन खुटेमाटे

नेत्ररोग तज्ज्ञ, चंद्रपूर

बाॅक्स

ही घ्या काळजी...

काॅन्टॅक्ट लेन्सच्या वापरामुळे लेन्स डोळ्यात अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री झोपताना लेन्सचा वापर करू नये.

लेन्सचा वापर दिवसभरात ७ ते ८ तास करावा. अधिक वेळ लेन्सचा वापर केल्यास डोळ्यांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. अशावेळी जर लेन्स घातलेली असेल तर डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.