शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

उथळपेठ देशातील आदर्श गाव बनविण्याचा संकल्प

By admin | Published: October 10, 2016 12:42 AM

केवळ वीज, लाईट, रस्ते आणि विविध सुविधा निर्माण केल्यानेच गाव आदर्श होत नाही. ज्या गावात आनंद आहे.

सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती : गावकऱ्यांना सोलर किटचे वाटपचंद्रपूर : केवळ वीज, लाईट, रस्ते आणि विविध सुविधा निर्माण केल्यानेच गाव आदर्श होत नाही. ज्या गावात आनंद आहे. तेच खरे आदर्श गाव आहे. उथळपेठ येथे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासोबतच प्रत्येकाला रोजगार व विविध प्रकारच्या सोईसुविधांच्या माध्यमातून हे गाव देशात सर्वात सुंदर आदर्श गाव बनवू, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.उथळपेठ हे गाव पालकमंत्र्यानीे दत्तक घेतले आहे. या गावातील नागरिकांना शनिवारी घरगुती सोलर किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सदर किट आयटीसी तसेच बिजली एलईडी लाईटनिंग कंपनीच्या वतीने वितरीत करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे, भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीष शर्मा, आयटीसी कंपनीचे दक्षिण विभागाचे प्रमुख आशिष पाल, जनरल मॅनेजर प्रशांत मिश्रा, बिजली एलईडी लाईटनिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गगन सिंहाल, जिल्हा परिषद सदस्या वर्षा परचाके, उपवनसंरक्षक धाबेकर, पंचायत समिती सदस्य सुनिल आलमवार, उथळपेठचे सरपंच रविंद्र सातपुते, उपसरपंच अविनाश बुरांडे आदी उपस्थित होते.उथळपेठ सर्वांत आदर्श गांव बनविण्याचा संकल्प आपण केला आहे. हा संकल्प गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होणार नाही. त्यामुळे यासाठी गावकऱ्यांच्या सकारात्मक विचाराची आवश्यकता आहे. देशात सर्वात सुंदर गावच्या संकल्पपूतीनंतर पंतप्रधानसुध्दा आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये या गावाचा उल्लेख केल्याशिवाय राहणार नाही, असे पालकमंत्री म्हणाले. तसेच परिसरातील २७ गावाच्या सरपंचांना हिवरेबाजार, राळेगणसिध्दी गावे दाखविणार असल्याचे त्यांनी सांगितले.सदर गांव शंभर टक्के सौरऊर्जेवर करणार असून त्यासाठी आराखडा तयार केला जात आहे. पर्यटनाचा आराखडाही केला जात असून त्याचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. गावाच्या विकासासाठी ५० लक्ष रुपये देण्यात आले आहे. तसेच निधीची आवश्यकता भासल्यास डिसेंबरमध्ये पुन्हा निधी देण्यात येईल. गावातील रस्ते या निधीतून सुंदर करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. बचत गटाच्या माध्यमातून कुक्कुट पालनाचे क्लस्टर तयार करण्यात येणार असून प्रत्येक शेतकऱ्यांच्या जमिनीचे आरोग्य पत्रकही दिल्या जाणार आहे. उथळपेठ रोजगारयुक्त गाव करण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखविला. प्रास्ताविक सरपंच रविंद्र सातपुते यांनी केले. (नगर प्रतिनिधी)ईश्वरच्या घरातून ईश्वरी कार्यास प्रारंभपालकमंत्र्यांच्या हस्ते गावातील काही घरात प्रत्यक्ष सोलर किट बसवून वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. ज्या घरातून त्यांनी शुभारंभ केला, त्या घरमालकाचे नांव ईश्वर चिचघरे असे होते. ईश्वर नावाच्या व्यक्तीच्या घरातून ईश्वरी कार्याचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळे निश्चितच उथळपेठ हे गाव पूर्णपणे सोलर गांव होणार असल्याचे आम मुनगंटीवार यावेळी म्हणाले. काही गावकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात पालकमंत्र्यांच्या हस्ते सोलर किटचे वितरण करण्यात आले.