बांधकाम साहित्य हटवावे
चंद्रपूर : शहरातील काही वॉर्डांमध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जात आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.
बेरोजगारांना रोजगार द्यावा
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून अनेक स्पर्धा परीक्षा झाल्या नाही. त्यामुळे बेरोजगारांमध्ये सध्या नैराश्य आले आहे. सद्य:स्थितीत कोरोना संकटाने पुन्हा तोंडवर काढले आहे. त्यामुळे या बेरोजगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
पुलावरील खड्डे बुजवावे
चंद्रपूर : येथील काही रेल्वे उड्डाणपुलावर खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पुलावरील खड्डे बुजवून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, वरोरा नाका उड्डाण पुलावरील खड्डा धोकादायक झाला आहे.
रस्त्याचे रुंदीकरण करा
चंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये मोठ्या संख्येने लोकसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत शहरातील रस्ते जैसे थे आहे. परिणामी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.पथदिव्यांची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : चंद्रपूर तसेच बल्लारपूर रस्त्यावरील काही पथदिवे बंद आहे. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पथदिवे दुरूस्त करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
इरईची स्वच्छता करावी
चंद्रपूर :शहराशेजारी असलेल्या इरई तसेच झरपट नदीची दुरवस्था झाली आहे. या नदीपात्राची स्वच्छता तसेच खोलीकरण करून इरईला वाचवावे, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केले आहे.