शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
3
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
4
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
5
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
6
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
7
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
8
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
9
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
10
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
11
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
12
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
13
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
14
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
15
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
16
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
17
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
18
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
19
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
20
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा खिळखिळी

By admin | Published: September 23, 2016 12:57 AM

राज्य शासनाकडून आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे.

रूग्णांना नाहक अडचणी : महत्त्वाच्या रूग्णालयात ३०७ पदे रिक्त चंद्रपूर : राज्य शासनाकडून आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. जिल्ह्यातील ३ उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये व जिल्हा सामान्य रूग्णालयात वर्ग १, वर्ग २, वर्ग ३ व वर्ग ४ संवर्गातील तब्बल ३०७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा पुरती खिळखिळी झाल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३९ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ९ अ‍ॅलोपॅथीक दवाखाने, १० आर्युवेदीक दवाखाने, ३ उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये आहेत. यापैकेी ३ उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये व जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये चारही संवर्गातील ९२० पदे मंजूर आहेत. यातील केवळ ५१३ पदे भरण्यात आली असून ३०७ पदे गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. तर आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचीही हीच अवस्था आहे. रिक्त पदांमध्ये एकाच अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपविण्यात आल्याने ते योग्य सेवा देण्यास असमर्थ ठरत आहेत. याचा त्रास रूग्णांना प्रचंड प्रमाणात सहन करावा लागत आहे. रूग्ण दाखल झाल्यास डॉक्टर उपस्थित राहत नाही, डॉक्टर असेल तर दुसरे कर्मचारी राहत नाही, अशी स्थिती जवळपास अनेक रूग्णालयात दिसून येते. त्यामुळे रूग्णावर वेळेवर उपचार होवू शकत नसल्याचेही प्रकार घडले आहेत. वरोरा, चिमूर व मूल या तीन उपजिल्हा रूग्णालयात वर्ग १ चे ३ पदे मंजूर असून एकच पद भरण्यात आले आहे. वर्ग २ च्या २९ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ च्या ९५ पदांपैकी ३४ तर वर्ग ४ च्या ४६ पदांपैकी २५ पदे रिक्त आहेत. तर दहा ग्रामीण रूग्णालयात वर्ग १ चे १० पदे मंजूर असून ९ पदे रिक्त आहेत. वर्ग २ च्या ३१ पदांपैकी ६ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ च्या १५४ पदांपैकी ४४ तर वर्ग ४ च्या ७० पदांपैकी २० पदे रिक्त असून ही पदे भरण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)जिल्हा सामान्य रूग्णालयात १६६ पदे रिक्तअत्यंत महत्त्वाचे रूग्णालय समजल्या जाणाऱ्या चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रूग्णालयात तब्बल १६६ पदे रिक्त आहेत. या रूग्णालयात वर्ग १ च्या २० पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. वर्ग २ च्या ३७ पदांपैकी १ रिक्त, वर्ग ३ च्या २७९ पदांपैकी ८५ पदे रिक्त असून वर्ग ४ संवर्गातील १७६ मंजूर पदांपैकी तब्बल ७० पदे रिक्त आहेत. रूग्णवाहिका आहेत, मात्र चालक नाहीतीन उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये व जिल्हा सामान्य रूग्णालयासाठी १०२ क्रमांकाच्या ३० रूग्णवाहिका आहेत. मात्र चालकाचे २४ पदे भरली असून जिल्हा सामान्य रूग्णालयात ३, वरोरा, सिंदेवाही व चिमूरच्या रूग्णालयात चालकाची पदे रिक्त आहेत. तसेच १०८ क्रमांकाच्या २१ रूग्णवाहिका असून याही रूग्णावाहिकांना चालक नाही. वर्ग ४ ची पदे हे स्थानिक स्तरावरून परीक्षा पद्धतीने भरली जातात. मात्र यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते. वर्ग १, २ व ३ ची पदे शासन भरत असते. रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. दर महिन्याला रिक्त पदांबाबत अहवाल पाठविला जातो. - डॉ. प्रदिप मुरंबीकर जिल्हा शल्यचिकीत्सक, चंद्रपूर.