जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किरणकुमार धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले होते. शिबिराप्रसंगी काटवली-बामणीचे सरपंच गिरीधर आत्राम, उपसरपंच विजय डंबारे, सचिव व्ही. एन. भुयार, ग्रा. पं. सदस्य माधुरी जेऊरकर, सुरेश पेंदोर, संगीत वाघाडे, विलास गुरनुले, ज्योती आत्राम आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे काटवली-बामणी या दोन्ही गावात कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आजघडीला एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. शिबिरात कोठारीचे डॉ. इकबाल शेख व त्यांच्या चमूने सहकार्य केले. परिसरातील लसीकरण उद्दिष्टपूर्तीसाठी उमेद महिला बचत गटाच्या महिला, जनसेवा ग्रामीण विकास शिक्षण प्रतिष्ठान, ग्रा.पं. कर्मचारी गजानन मडावी, रूपेश लोणारे, आशा वर्कर निशा गडकर आदी प्रयत्न करीत आहेत.
एकाच दिवशी २२० जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:18 AM