कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. प्रारंभी आरोग्य सेवेतील व्यक्तींना लस देण्यात आली. त्यात ७ हजार ३४५ आरोग्य सेवकांना पहिला डोस, तर ४ हजार ६३६ जणांना दुसरा डोस देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलीस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ४ हजार ४१७ जणांना पहिला डोस व २ हजार ३७६ जणांना दुसरा डोस देण्यात आला. आरोग्य सेवक व फ्रंटलाइन वर्कर मिळून ९ हजार ११६ नोंदणीकृत लाभार्थ्यांना पहिला व दुसरा, असे १८ हजार ७७४ डोस देण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक व ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले.
२ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी केंद्र निर्धारित करण्यात आले होते. यात ३ हजार ३१ जणांना कोविशिल्ड, तर १५०३ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली.
बाॅक्स
२७ हजार ७८५ ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस, तर ८ हजार ४०८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला, तसेच ११ हजार ३०५ व्याधीग्रस्त नागरिकांना पहिला डोस, तर २६०० जणांना दुसरा डोस देण्यात आला.