या लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारी २०२१ पासून झाली असून, आजतागायत ५५४९ नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष खिल्लारे यांनी दिली. दररोज जवळपास १२५ ते १५० लोकांचे लसीकरण होत आहे.
खेड मार्गावर असलेल्या कोविड सेंटरवर आजपर्यंत १२ हजारांवर चाचण्या करण्यात आल्या असून, यापैकी १२८२ पॉझिटिव्ह, तर उर्वरित निगेटिव्ह आलेत. पॉझिटिव्हपैकी ११५० रुग्ण बरे झालेले असून, चार लोकांचा मृत्यू झाला आहे. या कोविड सेंटरवर दररोज दीडशे चाचण्या होत आहे. सद्य:स्थितीत ४४ ॲक्टिव रुग्ण होम आयसोलेशन असून, ६५ रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती डॉ. सुभाष खिल्लारे यांनी दिली आहे.