या वेळी नारंडा येथील ज्येष्ठ नागरिक, माजी सरपंच वसंतराव ताजने यांचे पहिले लसीकरण करण्यात आले. तसेच दुसरी लस सुरेश मालेकर यांना देण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना जास्तीतजास्त प्रमाणात फायदा व्हावा यादृष्टीने सदर लसीकरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे.
प्रथम टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. लसीकरण हे मोफत उपलब्ध करण्यात येत आहे. तसेच सदर लसीकरण अतिशय सुरक्षित असून, ग्रामीण भागातील जनतेसाठी विशेषकरून लस उपलब्ध करण्यात आलेली आहे. या लसीकरणाचा जास्तीतजास्त प्रमाणात परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केलेले आहे. नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार, बुधवार व गुरुवारी ज्येष्ठ नागरिकांनी आपले आधार कार्ड घेऊन उपस्थित राहावे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल टेंभे यांनी दिली आहे.