शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जिल्ह्यात एक लाखांवर विद्यार्थ्यांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 10:37 PM

जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरुवात झाली असून आजपर्यंत जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रातील एकूण दोन हजार ६५४ शाळांपैकी ८५० शाळांमधून एक लाख सात हजार २१ विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यात आले आहे.

ठळक मुद्देमनपाचा पुढाकार : जिल्ह्यातील ८५० शाळांमध्ये राबविला उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरुवात झाली असून आजपर्यंत जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रातील एकूण दोन हजार ६५४ शाळांपैकी ८५० शाळांमधून एक लाख सात हजार २१ विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यात आले आहे. याकरिता पालक व विद्यार्थी यांचा उत्स्फर्त सहभाग लाभत आहे. मनपातर्फे जिल्ह्यातील नऊ महिने ते १५ वर्ष वयोगटातील मुले-मुंली गोवर, रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही. यासाठी सर्व विभाग सर्वतोपरी प्रयत्नरत आहेत.३ डिंसेंबरला वियानी विद्या मंदिर घुग्घुस येथे स्थानिक मान्यवरांच्या हस्ते गोवर-रुबेला लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जि. प. सदस्य नितू चौधरी, समन्वयक डॉ. श्रीधरण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, प्राचार्य रॉबर्ट निकोस घुग्घुस, अनंता बहादे, डॉ. माधुरी मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकडे आदी उपस्थित होते.भारत सरकारने सन २०२० सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून पाच आठवडयाच्या कालावधीमध्ये मोहिम राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील सर्व शाळा, सरकारी, निमसरकारी, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, आश्रम शाळा, मदरसे, सीबीएससी, आयसीएससी, केंद्रीय विद्यालय, आदी शाळामध्ये पहिल्या दोन ते तीन आठवड्यात व त्यानंतर अंगणवाडी केंद्र व सर्व आरोग्य संस्थेत मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहिम आरोग्य, शिक्षण व एकात्मिक बालविकास विभागाच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे.विविध रोगाला आळा बसणारगोवर हा अत्यंत संक्रामक आजार आणि घातक आजार आहे. हा मुख्यत: लहान मुलांना होतो. या आजारानंतर होणाऱ्या गुंतागुंतीमुळे बालकांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच रुबेला हा सौम्य संक्रामक आजार असला तरी गर्भवती स्त्रियांना रुबेला आजाराचा संसर्ग झाल्यानंतर अचानक गर्भपात किंवा नविन जन्म झालेल्या बाळास जन्मजात दोष अंधत्व, बहिरेपणा, मतिमंदत्व, हृदय विकृती होवू शकते. मात्र लसीकरणातून यावर आळा बसणार आहे.