चंद्रपूर : जिल्ह्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे. मात्र नोंदणी सुरू होताच एवघ्या काही मिनिटातच नियोजित डोससाठी नोंदणी बंद होत असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रादुर्भाव सारखा वाढत असल्यामुळे शासनाने लाॅकडाऊन केले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ती नियंत्रणात आणण्याचे काम प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. मात्र रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसल्यामुळे आता लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शासन लसीकरणावर अधिक भर देत आहेत. मात्र पाहिजे त्या प्रमाणात लसच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जानेवारी महिन्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्संना लस टोचण्यात आली. त्यानंतर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांनी तसेच १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यात येत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत असून, नागरिक आता स्वत:च लसीकरणासाठी केंद्रावर जात आहे. मात्र नोंदणीच होत नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बाॅक्स
१८ ते ४४ वयोगटातील किती जणांचे झाले लसीकरण
१७९०४
बाॅक्स
दिवसभर करतात प्रयत्न
कोरोना लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन करण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटात सर्वाधिक नागरिक आहेत. त्यामुळे मोठा गोंधळ उडत आहे. या वयोगटातील सर्वचजण सुशिक्षित असल्यामुळे प्रत्येकजण ऑनलाईन नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. एकाचवेळी सर्व नोंदणी करीत असल्यामुळे काही मिनिटातच संकेतस्थळ हाऊसफुल्ल होत आहे. सकाळपासून अनेकजण प्रयत्न करतात; मात्र संकेतस्थळ ओपनसुद्धा होत नसल्याचे तरुणांचे म्हणणे आहे.
कोट
युवक म्हणतात.. आठवडाभरापासून प्रयत्न करतोय
लसीकरणासाठी नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्यास ओटीपी येण्यापूर्वीच अवघ्या काही मिनिटातच बुकिंग संपल्याचा मॅजेस येतो. मागील आठवडाभरापासून प्रयत्न सुरू असूनही अद्यापही नोंदणी झाली नाही. अनेकांना नोंदणीपासूनच वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे लसीकरण केव्हा होणार, असा प्रश्न आहे.
- संकेत मडावी
चंद्रपूर
कोट
१ मेपासून लसीकरणाला सुरुवास झाली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून नोंदणीसाठी प्रयत्न करीत आहोत. परंतु काही वेळातच संकेतस्थळ बंद होत असल्याने नोंदणी करण्यास अडचण होत आहे. शासनाने जिल्हास्तरावर पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
- सतीश चहारे
चंद्रपूर
कोट
लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंग करण्याची चांगली पद्धत आहे. मात्र लसच उपलब्ध होत नसल्याने अनेकांना अडचणीचे होत आहे. संकेतस्थळावर नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्यास काहीच वेळात ‘बुकिंग बंद’ असा मॅसेज येत असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- मंगेश ताजने
चंद्रपूर