ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि भारतीय जनता पार्टीचे अतुल देशकर यांच्यात पहिल्या फेरीपासूनच निकराची लढत झाली. मा$$$त्र विजय वडेट्टीवार यांनी भाजपाचे अतुल देशकर यांचा १३ हजार ७७२ मतांनी पराभव केला.विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली. तब्बल ७५ टक्के मतदान झाल्याने वाढती टक्केवारी कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार, याबाबत सारेच संभ्रमात होते. परंतु मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून कॉंग्रेसचे वडेट्टीवार व भाजपाचे देशकर यांच्यात प्रथम व द्वितीय क्रमांकाचे स्थान अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिले. तृतिय स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप गड्डमवार कायम राहिले. संदीप गड्डमवार यांनी मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. परंतु आता ते तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेले. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात एकूण एक लाख ९१ हजार १७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांपैकी कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना ७० हजार २२८, अतुल देशकर यांना ५६ हजार ४५६, संदीप गड्डमवार यांना ४४ हजार ६७९ तर बसपाचे योगिराज कुथे यांना सात हजार ५७५ मते मिळालीत. पहिल्या फेरीपासून विजय वडेट्टीवार यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवून १३ हजार ६६३ मतांनी विजय संपादन केला. चुरशीच्या निवडणुकीत पहिला क्रमांक शेवटपर्यंत कायम ठेवला २०० ते ३०० मतांची आघाडी घेत हळूहळू तीन हजारांपासून ते एक लाख ३७ हजार ७२ मतांपर्यंत आघाडी कायम ठेवण्यात वडेट्टीवार यशस्वी ठरले. ब्रह्मपुरी- सावली व सिंदेवाही या तिन्हीही तालुक्यात विजय वडेट्टीवार यांना आघाडी मिळाली.
वडेट्टीवार-देशकरांमध्ये पहिल्या फेरीपासून लढत
By admin | Published: October 19, 2014 11:51 PM