चंद्रपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील एकूण आठ जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाकरिता असलेले आरक्षण वाढविले आहे. यासाठी राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे काँग्रेस ओबीसी विभागातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसींना ११ टक्के तर गडचिरोली जिल्ह्यात सहा टक्के आरक्षण मिळत होते. उर्वरित जिल्ह्यात १९ टक्के आरक्षण होते. त्यामुळे ओबीसी समाजावर नोकर भरतीत अन्याय होत होता. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सतत पाठपुरावा केल्याने आरक्षण वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आरक्षण वाढविण्यात आले आहे. सोमवारी चंद्रपुरात विजय वडेट्टीवार यांचे आगमन होताच काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सूर्या अडबाले, ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ताजणे, राजुरा तालुका अध्यक्ष उपसरपंच उमेश मिलमिले, राजुरा शहर अध्यक्ष संदीप आदे, कोरपना तालुका अध्यक्ष राहुल मालेकर, कवडू सातपुते, चंद्रपूर तालुका अध्यक्ष गणेश दिवसे, जिवती तालुका अध्यक्ष विष्णू मुसने, जिवती शहर अध्यक्ष दत्ता गिरी, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष प्रा. रमेश हुलके यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
काँग्रेस ओबीसी विभागातर्फे वडेट्टीवारांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:30 AM