लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्क़ूल येथील विद्यार्थी आदित्य मिलमिले याने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. यासोबत चंद्रपूर येथील माऊंट कार्मेट कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी शिवम कुमार हा ९७.८ टक्के घेऊन दुसरा आला आहे तर श्री महर्षी विद्या मंदिरातील आदित्य रोकमवार व माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलचा वेद देशकर यांनी ९७.४ टक्के गुण घेत संयुक्तपणे तृतीय स्थान पटकाविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.सीबीएसई अभ्यासक्रमाचा दहावीचा निकाल सोमवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी १०० टक्के निकाल देत आपली परंपरा कायम ठेवली आहे. चंद्रपुरातील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, श्री महर्षी विद्या मंदिर, बिजेएम कॉर्मेल अॅकेडमी, चांदा पब्लिक स्कूल, सेंट मायकल इंग्लिश स्कूल, चांदा पब्लिक, विद्या निकेतन, मॅक्रुन स्टुडंट अकाडमी, नारायणा विद्यालयम आदी शाळांमध्ये सीबीएससी दहावीचा अभ्यासक्रम आहे.या सर्व शाळांनी १०० टक्के निकाल तर दिला, सोबतच येथील बहुतांश विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण घेत प्राविण्य मिळविले.याशिवाय जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालय आयुधनिर्माणी, दिलासाग्राम हायस्कूल, बल्लारपूर, मोंटफोर्ट कॉन्व्हेंट, बामणी, विश्वज्योती कॉन्व्हेंट तळोधी (बा.), नवोदय विद्यालय, तळोधी (बा.), साई कॉन्व्हेंट भद्रावती, सेंट कॅलरेट इंग्लिश मिडीयम स्कूल, चिमूर, इन्फंट कॉन्व्हेंट, राजुरा, होली फॅमिली पब्लिक स्कूल, गडचांदूर, अंबुजा विद्या निकेतन, गडचांदूर, स्टेला मॉरीस कॉन्व्हेंट, बामणवाडा, आदित्य बिरला पब्लिक स्कूल, आवारपूर, संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा, आदी शाळांनीही १०० टक्के निकाल देत आपली परंपरा कायम ठेवली आहे.माऊंट कार्मेलचे ४० विद्यार्थी गुणवत्ता यादीतचंद्रपुरातील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलने यंदाही १०० टक्के निकाल दिला आहे. याशिवाय यंदाच्या निकालात या शाळेतील तब्बल ४० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण घेत प्राविण्य प्राप्त केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गुणवत्ता यादीत असणारी ही जिल्ह्यात पहिलीच शाळा ठरल्याचे मानले जात आहे.स्पर्धा वाढली, दर्जाही वाढतेयसध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे आपला पाल्य स्पर्धेच्या युगात टिकावा, यासाठी पालक पाल्यांना चांगल्या व दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश देण्यास उत्सुक असतो. यामुळे शाळांमधील स्पर्धाही वाढली आहे. जिल्ह्यात अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये स्पर्धा वाढली असून दर्जा टिकविण्यासाठी शाळा प्रशासन झटताना दिसत आहे.
वरोऱ्याचा आदित्य मिलमिले अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 12:52 AM
वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्क़ूल येथील विद्यार्थी आदित्य मिलमिले याने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. यासोबत चंद्रपूर येथील माऊंट कार्मेट कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी शिवम कुमार हा ९७.८ टक्के घेऊन दुसरा आला आहे तर श्री महर्षी विद्या मंदिरातील आदित्य रोकमवार व माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलचा वेद देशकर यांनी ९७.४ टक्के गुण घेत संयुक्तपणे तृतीय स्थान पटकाविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
ठळक मुद्देदहावीचा निकाल १०० टक्के : चंद्रपुरातील शिवम कुमार द्वितीय, आदित्य रोकमवार व वेद देशकर तृतीय