गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह विविध उपक्रमाच्या माध्यमाने साजरा करण्यात आला.
तालुक्यातील डाेंगरगाव येथे विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. २१ जून ते १ जुलै या दरम्यान कृषी संजीवनी सप्ताहानिमित्ताने शेतीशाळा तसेच विविध उपक्रम राबविले गेले. महाकाॅट कापूस पीकअंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव या गावात एक गाव एक वाण हा कार्यक्रम कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी खत व तणनाशके यांचे व्यवस्थापन, सोबतच खताच्या मात्रा कशा दयाव्यात. कीड व किटकनाशके, मित्र किडी व मित्री किडीचे महत्व, त्याचे जतन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोलाईत, टोंगलवार, बुच्चे, सरपंच साजन झाडे, देवराव शेडमाके यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनात कृषी सहाय्यक कल्पना आनंदराव चौधरी यांनी केले.