मूल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने सात वर्षे पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी मूल शहर व महिला मोर्चाच्या वतीने मूल येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.
सदर उपक्रम भारतीय जनता पार्टीचे मूल शहराध्यक्ष प्रभाकर भोयर याच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. अध्यक्षस्थानी मूलच्या नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर होत्या, प्रमुख अतिथी म्हणून नगरपालिकेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, शांता मांदाडे, अनिल साखरकर, मिलिंद खोब्रागडे, नगरसेवक प्रशांत लाडवे, विनोद सिडाम, प्रभा चैथाले, मनीषा गांडलेवार, रेखा येरणे, आशा गुप्ता, विद्या बोबाटे, वंदना वाकडे, वनमाला कोडापे, महिला मोर्चा कार्यकर्ता अर्चना चावरे, कल्पना मेश्राम, मीडिया प्रमुख कल्पना पोलोजवार आदी उपस्थित होते.
यावेळी उपक्रमांतर्गत कोविड सेंटरमध्ये कार्यरत डाॅक्टर, परिचारिका, वाॅर्डबाॅय, कोविडच्या मयत रुग्णांवर अंत्यसंस्कार करणारे नगरपालिका कर्मचारी यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, कोविडबाधित रुग्णांना गूळ-फुटाणे, बिस्कीट व मास्क वितरित करण्यात आले, त्यासोबत मूल शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांना नगरसेवकांच्या हस्ते २० हजार मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी मूल नगरपालिकेचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येेने उपस्थित होते.