चंद्रपूर : ब्ल्यू मिशन मल्टीपर्पज पब्लिक ट्रस्ट चंद्रपूरद्वारा निर्मित महास्थवीर भदंत सुमनवन्नो पिंपळवनचा चौथा वर्धापन दिन थाटात साजरा करण्यात आला. यावेळी भिक्खू संघाची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ब्ल्यू मिशन मल्टीपर्पज पब्लिक ट्रस्टचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. दुषंत नगराळे, ट्रस्टच्या अध्यक्ष अल्का मोटघरे यांच्या हस्ते १५ भिक्खूंना मेडिकल किटचे वितरण करण्यात आले.
मागील चार वर्षांपूर्वी बाबुपेठ परिसरातील बुद्धविहारासमोर महास्थवीर भदंत सुमनवन्नो पिंपळवन तयार करण्यात आले. आज येथील पिंपळवन डोलाने उभे आहे. या पिंपळवनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त भिक्खू संघाना मेडिकल किटचे वितरण करून भोजनदान करण्यात आले. यावेळी नीता नागदेवते, सीमा ठाकूर, बबिता अग्रवाल, रंजना नागतोडे, मंदा पडवेकर, श्रध्दा आंबेकर, लक्ष्मी खोब्रागडे, डाॅ. विद्याधर बन्सोड, उमाकांत घोडेस्वार, धवल रामटेके, सृजल, हर्षल नगराळे, इंजि. प्रदीप अडकिने, भाऊराव नगरकर, मुबारक, मनीषा पिपरे, शीला उमरे, प्रीती बाराहाते, रामेश्वरी जांभुळे, सुनीता रावलकर, अपूर्वा जांभुळे, स्निग्धा पिपरे आदी उपस्थित होते.