हरभरा खरेदी शुभारंभाचा कार्यक्रम राजीव गांधी मार्केट यार्ड वरोरा येथे पार पडला. या वेळी सुभाष चंपतराव राऊत, विजय दामोदर चोपणे, प्रशांत विजय चोपणे, विठ्ठल देवराव कोसुरकर, कासू विजय चोपणे, गुलाब बापूराव डरे या हरभरा घेऊन येणाऱ्या प्रथम पाच शेतकऱ्यांना शाल व श्रीफळ देऊन बाजार समिती वरोराचे सभापती राजेंद्र चिकटे, उपसभापती देवानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी दत्ताभाऊ बोरेकर, बंडू शेळके, संजय घागी, चंद्रसेन शिंदे, कन्हैया वरुटकर, कैलास बनसोड, पुरुषोत्तम कोल्हे तसेच इतर कर्मचारी व शेतकरी बंधू उपस्थित होते. एकूण ६२ क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. शेतकरी बांधवांनी शासकीय हरभरा खरेदी केंद्रावर आपला हरभरा विक्री करून शासकीय हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती राजेंद्र चिकटे यांनी केले.
वरोरात हमीभावाने चना खरेदीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:51 AM