लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा: वरुर ते विरुर (स्टे.) हा तेलंगणा राज्याकडे जाणारा राज्य मार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे जीवघेणा ठरला आहे.वरुर ते विरुर (स्टे.) हा १२ किमी अंतराचा मार्ग आहे. मात्र, केवळ दोन किमीचे डांबरीकरण यावर्षी करण्यात आले. उर्वरीत १० किमीचा मार्ग उखळला आहे. बºयाच ठिकाणी जुने डांबरीकरण करुन गेले आहे. काही ठिकाणी डांबरीकरण उखळून खालची माती वर आली आहे. मोठ्या खाई पडलेल्या आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची स्थिती अतिशय वाईट आहे. यंदा पावसापूर्वी डागडुजी करण्यात आली. हे काम करताना नियत्म धाब्यावर ठेवण्यात आले. या मार्गावरुन वाहन चालविणे कठीण झान्ले आहे. मागील आठवड्यात अनेकांवर गंभीर जखमी होण्याची वेळ आली. सुमारे दोन-तीन वर्षापासून रस्ता दुरुस्तीची सतत मागणी केली जात होती. परंतु कुंभकर्णी झोपेत असलेले अभियंतास जाग आली नाही. त्यामुळे जाणेयेणे करणे धोक्याचे झाले असून अपघाताचे स्थळ बनले आहे. सध्या रस्त्याची रस्त्याची स्थिती गंभीर असून १० किमीचा रस्ता जाण्यासाठी एक तास लागतो.विरुर परिसरातील धानोरा, कविपेठ, सुब्बई, चिंचोली, अंतरगाव, अन्नुर, भेंडाळा, सिर्सी, टेंभुरवाई या गावातील वाहनचालक राजुरा येथे जाण्यास निघाले असता घरच्या मंडळीना परत येत पावेतो सतत सुखरुप येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी लागत आहे.अपघाताच्या घटनांत सतत् वाढ होत असल्याने वाहनधारक त्रस्त झालेत. काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे सोडून दिले.नागरिक व वाहनधारकांचे हित लक्षात घेऊन रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, माजी पं.स. सभापती मारोतराव जेनेकर, अविनाश जाधव, भिमय्या अंगलवार, सुब्बईचे सरपंच मारोती आत्राम, पंचायत समिती सभापती कुंदा जेणेकर, शाहू नारनवरे, रामटेके आदींनी निवेदनातून केली आहे.
वरुर-विरुर (स्टेशन) रस्ता खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:32 PM
वरुर ते विरुर (स्टे.) हा तेलंगणा राज्याकडे जाणारा राज्य मार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे जीवघेणा ठरला आहे.
ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अपघाताच्या घटनांत वाढ, नागरिक त्रस्त