वेकोलितील डंपर खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:19 PM
बल्लारपूर वेकोलि खुल्या खाणीत कोळसा खननाचे काम सुरु असताना ३५ लाखांचा डम्पर जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडली. डम्परची नियमित तपासणी होत नसल्याने ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
<p>लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर वेकोलि खुल्या खाणीत कोळसा खननाचे काम सुरु असताना ३५ लाखांचा डम्पर जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडली. डम्परची नियमित तपासणी होत नसल्याने ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.बल्लारपूर कोळसा खाणीत दररोज खोळसा खननाचे काम सुरु असते. रविवारी दुपारी डम्पर चालक मुक्कू हे डम्पर चालविण्यासाठी खुल्या कोळसा खाणीत गेले. दरम्यान डम्परला अचानक आग लागली. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर सुरक्षा विभागाकडून आग विझविण्याचे काम सुरु करण्यात आले. परंतु सुरक्षा पंपातही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने आग विझविता आली नाही. दरम्यान नगरपरिषदच्या अग्निशमन दलाल पाचारण करण्यात आले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग विझविली. मात्र हा डम्पर जळून खाक झाला. बल्लारपूर वेकोलितील कोळसा खननाचे यंत्रसामुग्रीची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप होत आहे.