राजुरा : राजुरा तालुक्यातील पंचाळा या गावातील ११ महिलानी एक बचत गट तयार करून शासकीय योजनेतून सुंदर अशी भाजीपाला रोपवाटिका तयार केली आहे.
निसर्ग बचत गटाच्या माध्यमातून रोपवाटिका योजना तयार करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान आणि पन्नास टक्के बचतगट अशी योजना होती. यामध्ये प्रामुख्याने कृषी विभागाच्या उपविभागीय कृषी अधिकारी जी.डी. मोरे, तालुका कृषी अधिकारी वी. के. मकपल्ले यांनी गावात जाऊन बचत गटाच्या माध्यमातून सुंदर अशी भाजीपाला रोपवाटिका तयार केली. चार लाख ६० हजारांची रोपवाटिका असून दोन लाख ३० हजार बचत गटाला बचत करता आली आणि एक रोजगार उपलब्ध झाला. यामुळे महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी कृषी अधिकारी यांनी मोठी मदत केली. अशा प्रकारची योजना जनमानसापर्यंत पोहचणे गरजेचे असते आणि गावाच्या विकासासोबत महिलांचा आर्थिक विकास होतो.
===Photopath===
020621\img-20210602-wa0199.jpg
===Caption===
भाजीपाला रोपवाटिका पहाताना कृषी अधिकारी