लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : फुटपाथवर फळविक्री करणाºया महिलांना मोकाट जनावरे वाहून नेणाºया वाहनात कोंबून पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी चंद्रपूर मनपाच्या अतिक्रमण विभाग पथकाकडून घडला. या संतापजनक प्रकारामुळे मनपाच्या अतिक्रमण पथकावर नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.चंद्रपूर शहरात अतिक्रमण विरोधात मनपाची कारवाई सुरू आहे. मात्र ही कारवाई मोठ्यांना अभय व लहान व्यवसायिकांना त्रास अशीच असल्याचे मंगळवारच्या प्रकारावरून दिसून येते. शहरातील दुर्गापूर मार्गावरील वाहतूक शाखेच्या समोरील फुटपाथवर अनेक महिला फळविक्रीचा व्यवसाय करतात. मात्र त्यांना दररोजच हटविले जात आहे. मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास मनपाचे अतिक्रमण हटाव पथक येथे पोहोचले. तेव्हा सर्व महिलांचे फळांचे टोपले जप्त करून मोकाट जनावरे वाहून नेणाºया वाहनात टाकण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या फळविक्रेत्या महिलांही वाहनात जाऊन बसल्या. तेव्हा या महिलांना रामनगर पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसी खाक्या दाखविल्याशिवाय या ऐकणार नाही, असे म्हणत पथकाच्या कर्मचाºयांनी वाहनाचा मागचा पल्ला लावला. त्यामुळे सर्व महिला पथकावर रोष व्यक्त करीत होत्या.यापुर्वीही या पथकाने अशीच कार्यवाही करून सर्व महिलांचे फळ जप्त केले. त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात फळ वाटप करण्यात आले. तेव्हा फळविक्रेत्या महिलांचे मोठे नुकसान झाले होते. यावेळीही फळाचे टोपले जप्त करण्यात आल्याने आपले नुकसान होईल म्हणून महिलाही स्वत:च वाहनात जाऊन बसल्या. मात्र पथकाचे कर्मचारी व अधिकारी हे त्यांना पोलिसांत नेण्याची धमकी देत वाहनांचा मागचा पल्ला बंद केला. हा सर्व प्रकार रस्त्याने जाणारे नागरिक पाहून संताप व्यक्त करीत होते. मनपा आयुतांच्या आदेशानंतर महिलांना सोडून देण्यात आले. मात्र फळ जप्त करण्यात ंआल्याने मोठे नुकसान झाले.जप्त केलेल्या वस्तुची नासधूसलोकमान्य टिळक शाळेसमोर बेल्ट आणि सन गॉगल्सचे दुकान लावणाºया महंमद अयुब या छोट्या व्यवसायीकाची ताडपत्री अतिक्रमण विभाग पथकाने जप्त केली. ही ताडपत्री सोडविण्यासाठी महंमद अयुब यांनी मनपामध्ये १०० रुपये शुल्क भरले. त्यांना ताडपत्री परत मिळाली. मात्र, त्या ताडपत्रीला ब्लेड मारून पूर्णत: नासधूस करण्यात आली होती. अयुब यांनी नवीकोरी ताडपत्री दुकानाला लावली होती. अतिक्रमण पथकाकडून लहान व्यवसायीकांना त्रास देण्याचे प्रकार नित्याचेच झाले असून अतिक्रमण प्रमुख नामदेव राऊत यांनी ५ जानेवारी २०१६ ला आपल्याला दुकान हटविण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार पोलिसात केली होती, असे महंमद अयुब यांनी ‘लोकमत’ला सांगितले.नागरिकांनी व्यक्त केला संतापशहरातील मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्याकरिता मनपाने अर्थसंकल्पात तरतूद करून मोकाट जनावरे नेण्याकरिता वाहने खरेदी केलीत. या वाहनातून शहरातील मोकाट जनावरांना नेण्यात येते. यात मृत व आजारी जनावरांना नेले जाते. मात्र मंगळवारी या वाहनात महिला स्वत:हून बसल्या असल्या तरी पथकाच्या कर्मचाºयांनी वाहनाचा पल्ला लावून पोलिसांत नेण्याची धमकी देत होते. हा प्रकार पाहून अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला. फळविक्री केल्यानंतर घाण पसरणार नाही, यासाठी महिला स्वच्छतेसाठी स्वत: पुढाकार घेत असतानाही मनपा सतत कार्यवाही करीत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.कार्यवाही भेदभावपूर्णझोन क्रमांक तीन मधील मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी केलेली कारवाई भेदभावपूर्णच असल्याचे दिसून येते. अतिक्रमण हटाव मोहिमचे नागरिकांकडून कौतुक होत असले तरी शहरातील कस्तुरबा व गांधी मार्गावर अनेक मोठ्या व्यवसायिकांनी फुटपाथ गिळंकृत करून दुकानाचे सामान रस्त्यावर लावतात. त्यांच्यावर कार्यवाही होताना दिसत नाही. मात्र वाहतूक शाखेसमोरील फुटपाथवर टोपले घेऊन बसणाºया फळविक्रेत्या महिलांवर वारंवार कार्यवाहीचा बडगा उगारला जात असून त्यांचे अनेकदा फळ जप्त करण्यात आल्याने मोठे नुकसान होत आहे. मंगळवारही फळ जप्त करण्यात आले होते.वाहनावर मोकाट जनावरे नियंत्रण वाहन लिहले असले तरी या वाहनाचा कुठेही वापर होतो. पथकाने केवळ फळाचे टोपले जप्त केले. मात्र महिला स्वत:च वाहनात जाऊन बसल्या. काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आले.- नामदेव राऊत, अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख, मनपा चंद्रपूर
जनावरांच्या वाहनात महिलांना कोंबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:24 AM
फुटपाथवर फळविक्री करणाºया महिलांना मोकाट जनावरे वाहून नेणाºया वाहनात कोंबून पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी चंद्रपूर मनपाच्या अतिक्रमण विभाग पथकाकडून घडला.
ठळक मुद्देदुर्गापूर मार्गावरील प्रकार : मनपाच्या अतिक्रमण विभाग पथकाची संतापजनक कार्यवाही