बल्लारपूर : शहरातून जाणारा एकमात्र राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते; परंतु अनेक व्यावसायिक २४ तास आपले जड वाहन रस्त्यावर ठेत असतात. परिमाणी, वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशा वाहनावर कारवाई करण्याचे संकेत पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिले आहे.
बल्लारपुरातील अनेक जण ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय करतात. त्यामुळे वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावर दिवसभर सिमेंट व फ्लाय ऐश घेऊन जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. तर दुसरीकडे पेपरमिल ते बामणीपर्यंत रस्त्याच्या बाजूने २४ तास जड वाहने उभे असतात. याशिवाय भंगार वाहने रस्त्याच्या बाजूलाच वर्षभरापासून पडून आहेत. यामुळे वाहतुकीला त्रास होतो. त्यातच बामणी ते राजुरा मार्गावर पावसामुळे खड्डे पडले असल्याने अपघाताची शक्यता आहे. शहरातील संघटनांनी याबाबत निवेदन देताच ठाणेदारांनी कारवाईचे संकेत दिले आहे.