वसाहतीएकतानगरच्या समस्यांकडे वेकोली प्रशासनाचे दुर्लक्ष
भद्रावती - वेकोली कर्मचाऱ्यांसाठी निर्माण केलेल्या एकता नगर वसाहतीमध्ये अस्वच्छता, झुडपी जंगल तसेच परिसरात पथदिवे नसल्याने या प्रकाराकडे वेकोली प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. या परिसरात हिस्त्र प्राण्यांचे ठिकाण बनले असल्याने या वसाहतीमध्ये चिंतेचा विषय ठरला आहे.
माजरी एरियातील तेलवासा, चारगाव , ढोरवासा, कुन्हाळा या खुल्या कोळसा खाणीतील कामगारांकरिता एकता नगर वसाहत निर्माण करण्यात आली गेल्या काही वर्षापासून या चारही खुल्या कोळसा खाणीचे उत्पादन बंद असल्याने त्या बंद पडल्या आहे व तेथील कामगारांना एरियातील इतर खाणीमध्ये बदल्या करण्यात आले आहे मात्र या कामगारांचा परिवार याच एकता नगर वसाहतीमध्ये वास्तव्यात आहे. ज्याप्रकारे या खुल्या कोळसा खाणी बंद असल्याने वेकोलि प्रशासनाने येथील एकता नगर वसाहती कडे सुद्धा दुर्लक्ष केले आहे दिवसेंदिवस इथे समस्या निर्माण होऊन परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल तयार झाले आहे, कचराकुंड्या ओवर फ्लो झाल्या आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे . त्यातच रस्त्यावरील बहुतांश पथदिवे बंद अवस्थेत पडले आहे त्यामुळे रात्र ला या परिसरात अंधार असतो याच अंधाराचा फायदा घेऊन रानटी डुकरे मोठ्या प्रमाणात वसाहतीमध्ये फिरत असतात त्यातच कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आता तर काही दिवसांपूर्वी वाघीण आपल्या तीन पिल्या सह वसाहतीमध्ये आढळून आली होती त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वसाहतीतील कंपाउंड वॉल तुटलेली असून ते दुरुस्त करण्यात यावी त्यामुळे बाहेरील प्राणी आत मध्ये प्रवेश करणार नाही त्यातच घनकचरा नेहमी साफ करण्यात यावा, रात्र दरम्यान पथदिवे नेहमी चालू ठेवण्यात यावे अशी मागणी वसाहतीतील नागरिकांनी केली आहे.
.