वीस किलोमीटर परिसरात राहणाऱ्या गरजूंना सर्व सुविधा यामध्ये वीज, पाणी आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे हे वेकोलीचे सामाजिक दायित्व आहे. वेकोली मात्र येथील जनतेवर अन्याय करत आहे. वेकोलीने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे येथील कुटुंबीयांचे हाल होत आहेत. शाळांचे वर्ग ऑनलाइन असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना ऑनलाइन परीक्षा देता आली नाही. यासह अनेक कामांचा खोळंबा झाला आहे. याकडे लक्ष वेधतानाच वेकोलीच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत, शेकडो घरे पडली. वेकोलीच्या प्रदूषणामुळे येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. हे सर्व सहन करीत असताना वेकोलीकडून मात्र अन्यायच होतो आहे, असा आरोप पत्रातून माजरीवासीयांनी केला आहे.
कोट
माजरीच्या वाॅर्ड क्रमांक एक व पाचचा वीजपुरवठा वेकोलीने खंडित केला आहे. तो लवकर पूर्ववत करावा, असे पत्र वेकोलीचे मुख्य महाप्रबंधकांना दिले आहे.
- रमेश उके, ग्रामविकास अधिकारी, माजरी