प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : चंद्रपूर जिल्ह्याचा पारा ४५ अंशावर पोहोचला आहे. भरदुपारी उन्हात निघणे कठीण आहे. दुपारच्या सुमारास गजबजणारे रस्तेही निर्मनुष्य झाले आहे. मात्र शेतीची कामे केव्हाही आपल्यालाच करावी लागणार, म्हणून जगाचा पोशिंदा ४५ अंश तापमानाचे रखरखते उन्ह अंगावर झेलत शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे.यावर्षी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला आले आहे. हवामानाचा अचुक वेध घेणाऱ्या संस्थांनी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४५.९ अंश सेल्सीअसपर्यंत गेल्याची नोंद केली आहे. मे महिन्यात तापमानाचा उच्चांक वाढण्याची शक्यता आहे. अशा रखरखत्या उन्हात बळीराजा शेतीकामात व्यस्त आहे. यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकºयांचा आर्थिक बजेट बिघडला आहे. उत्पादन खर्च वाढला, त्या तुलनेत यावर्षी उत्पादन झाले नाही. सर्वच शेतमालाचे भाव पूर्णत: पडल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला आहे. उसनवारी व कर्ज काढून शेतकºयांनी कशीबशी शेती केली होती. मात्र यावर्षी शेतकºयांचा हाती काहीच लागले नाही.शेतकºयांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळत चालला आहे. यावर्षी शेती करायची की नाही, या द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. तर काही शेतकरी शेती ठेक्याने देऊन मोकळे झाले आहे. सध्या शेतातील सर्व शेतमाल निघाला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकºयांनी हंगामाला सुरुवात केली आहे.यावर्षी पावसाळा लवकर सुरु होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी ४५अंशाच्या रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करीत आहे.शेतीच्या कामांना वेगशेतकºयांनी शेतातील माल काढला आहे. त्यामुळे पुढील हंगामासाठी नागरणी, वखरणी व इतर शेतीची मशागतीची कामे शेतकरी करीत असून शेतकामांना आता चांगलाच वेग आला आहे.उन्हामुळे रस्ते झाले निर्मनुष्यजगात चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक असल्याची नोंद केली गेली आहे. एप्रिल महिन्यातच जिल्ह्याचे तापमान ४५ अंशापार गेल्याने शहरी भागातील रस्ते दुपारी ओस पडू लागले आहे. गावखेड्यातही हीच परिस्थिती आहे. मात्र शेतकरी मात्र शेतीत मशागत करताना दिसून येत आहे.
४५ अंशाचा पारा अंगावर झेलतोय बळीराजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:42 AM
चंद्रपूर जिल्ह्याचा पारा ४५ अंशावर पोहोचला आहे. भरदुपारी उन्हात निघणे कठीण आहे. दुपारच्या सुमारास गजबजणारे रस्तेही निर्मनुष्य झाले आहे. मात्र शेतीची कामे केव्हाही आपल्यालाच करावी लागणार, म्हणून जगाचा पोशिंदा ४५ अंश तापमानाचे रखरखते उन्ह अंगावर झेलत शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे.
ठळक मुद्देरखरखत्या उन्हात शेतीची कामे : पोटासाठी आटापिटा