अजिंक्य वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कदुर्गापूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये वन्यजीवांच्या संरक्षणार्थ श्वास उपाययोजना केल्या आहेत. मात्र यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने खिळखिळ्या सुरक्षा व्यवस्थेला भेदून शिकाऱ्यांनी वाघिणीचा बळी घेतला. याप्रकरणात अद्यापही वनविभागाला आरोपींचे धागेदोरे गवसले नाही. शिकाºयांचा शोध घेण्याचे आव्हान वनविभागासमोर उभे ठाकले आहे.ताडोबातील वाघांसह वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनाकरिता ६२५.४० चौरस किमी क्षेत्राला कोअर झोनचा दर्जा देण्यात आला आहे. या अतिसंरक्षित क्षेत्रात तेथील कर्मचाºयांशिवाय इतर कोणालाही प्रवेश नाही. येथे मोठ्या प्रमाणात वनकर्मचारी, अधिकारी व वनमजूर कार्यरत आहेत. याशिवाय येथे विशेष व्याघ्र संरक्षण दलाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच येथे संरक्षण पथकही कार्यरत आहे. त्यांची येथे नियमितपणे गस्त सुरू असते. सर्वत्र टॅप कॅमेरे लावले आहे. ठिकठिकाणी तपासणी नाके आहेत. कोअर झोनमध्ये शिरण्याचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त असतो. त्यामुळे कोणीही या क्षेत्रात शिरण्याचे धाडस करीत नाही. एवढी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही ती भेदून कोअर क्षेत्रात असलेल्या खातोडा तपासणी नाक्यालगतच वाघिणीची शिकार होते, ही एक सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी व तेवढीच गंभीर घटना आहे.मोहर्ली प्रवेशद्वारापासून खातोडा तपासणी नाका साधारणता १२ किमी अंतरावर आहे. खातोड्यापूर्वी पळसगाव व खुटवंडा ही दोन गावे आहेत. ही गावे खातोडा गेटपासून दोन ते तीन किमी अंतरावर आहेत.खातोडा गेटपासून ताडोबाकडे जाणाºया मुख्य मार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर शिकाºयांनी दोन झाडांना पाच फासे बांधून ठेवले होते. उन्हाळ्यामुळे जंगल सुकलेले असल्याने ते फासे स्पष्ट दिसतील, असे होते. मात्र ते सुरक्षा पथकाच्या लक्षात कसे आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकंदरीत ही वाघीण ताडोबातील ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेचीच बळी ठरली आहे.वनविभागाकडून चौकशी सुरूवाघीण शिकार प्रकरणाची वनविभागाकडून सखोल चौकशी केली जात आहे. मात्र वनविभागाला अद्यापही शिकाºयांचे धागेदोरे गवसलेले नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनापुढे शिकारी टोळीला हुडकून काढण्याचे कडवे आव्हान आहे. याशिवाय क्षेत्र संचालकांचे मुख्यालय ताडोबात असावे, अशीही वन्यप्रेमींची मागणी आहे. या संदर्भात विचारणा करण्यासाठी ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एका व्यक्ती संशय असून त्याच्यावर पाळत ठेवली जात आहे. लवकरच आरोपींना गजाआड करू, असे सांगितले.
ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेने घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:40 PM
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये वन्यजीवांच्या संरक्षणार्थ श्वास उपाययोजना केल्या आहेत. मात्र यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने खिळखिळ्या सुरक्षा व्यवस्थेला भेदून शिकाऱ्यांनी वाघिणीचा बळी घेतला. याप्रकरणात अद्यापही वनविभागाला आरोपींचे धागेदोरे गवसले नाही. शिकाºयांचा शोध घेण्याचे आव्हान वनविभागासमोर उभे ठाकले आहे.
ठळक मुद्देआरोपी मोकाटच : वाघिणीच्या शिकाऱ्यांना पकडण्याचे आव्हान