लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विदर्भ विकास मंडळाच्या अधिकाºयांनी विदर्भ विकास आराखडा तयार करण्यासाठी चंद्रपूर येथील शासकीय कार्यालयाच्या विविध विभागाच्या प्रमुखांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली.जिल्हाधिकरी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या बैठकीत डेव्हलपिंग ग्रोथ स्टॅटेजी फॉर विदर्भ हा अभ्यास अहवाल तयार करण्यासाठी उपसमिती गठित करण्यात आली आहे. या उपसमितीचे सदस्य डॉ. कपिल चांद्रापण, डॉ. विनायक देशपांडे आणि प्रज्ञा नगरनाईक यांनी यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी, सिंचन, पणन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभाग, मत्सव्यवसाय, शिक्षण विभाग तसेच इतर विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा केली.अभ्यास अहवालामध्ये जिल्ह्यातील वेगळया, अभिनव व पथदर्शी प्रकल्पांना घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच विभागाने याबाबत माहिती देण्याची मागणी केली आहे. लवकरच विदर्भ विकास आरखडा सादर केला जाणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे.
विदर्भ विकास मंडळाने घेतली जिल्ह्यातील अधिकाºयांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:52 AM
विदर्भ विकास मंडळाच्या अधिकाºयांनी विदर्भ विकास आराखडा तयार करण्यासाठी चंद्रपूर येथील शासकीय कार्यालयाच्या विविध विभागाच्या प्रमुखांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात सभा : विदर्भ विकास आराखड्याची तयारी