आदिवासी उपयोजन क्षे़त्रातील शाळा, तुकड्यांना बिगर आदिवसी क्षेत्रामध्ये रूपांतरीत करून नियमित वेतन अनुदान मंजूर करण्यात यावे व दरमहा १ तारखेला वेतन अदा करावे, या मागणीसाठी कोविड नियमांचे पालन करून सर्व शिक्षक कुटुंबासह एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करणार आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे, उपाध्यक्ष सुनील शेरकी, नामदेव ठेंगणे, गंगाधर कुनघाडकर, मंजुषा धाईत, कोषाध्यक्ष दिगंबर कुरेकर, सहकार्यवाह अनिल कंठीवार, शालिक ढोरे, नितीन जिवतोडे, सोनाली दांडेकर, दीपक धोपटे, मारोतराव अतकरे, प्रमोद काेंडलकर, देवराव निब्रड, श्रीराम भोयर, सचिन तपासे, मनोज वासाडे, रामदास आलेवार, धनंजय राऊत, रंजना किन्नाके, ज्ञानेश्वर सोनकुसरे, प्रभाकर पारखी, आंनद चलाख यांनी केले आहे.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना करणार अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:21 AM