लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : हिऱ्याला पैलू पाडून त्याला आकर्षक आकार देण्याचे प्रकार देणारे प्रशिक्षण केंद्र बल्लारपुरात साकार झाले आहे. हे प्रशिक्षण केंद्र विदर्भातील बेरोजगार तरुणांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन रविवारी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.उदघाटनीय कार्यक्रमात बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील तरूणांना मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध करणे ही आपली प्राथमिकता आहे. त्यादृष्टीने रोजगाराभिमुख विविध उपक्रम आपण सुरू करीत आहोत. बल्लारपुरात डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला प्रशिक्षणार्थ्याला २० हजारावर रोजगार देण्याचा व तीन वर्षात तीन हजार तरूण त्या माध्यमातून प्रशिक्षित करण्याचा आमचा मानस आहे. प्रतिवर्ष एक हजार तरूण या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडतील.तरूणांसाठी आर्थिक स्वातंत्र्याच्या अभियानाला सुरूवात आम्ही या जिल्ह्यात केली आहे. चांदा ते बांदा हा उपक्रम रोजगाराभिमुख आहे. याचे कौतुक निती आयोगाने सुध्दा केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा येथे विमानतळ विकासासाठी १२०० एकर जागा उपलब्ध झाली आहे. बल्लारपूर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रसुध्दा सुरू होणार आहे. हिंगणघाटचे मोहता यांच्या मदतीने बल्लारपूर येथे महिलांना कापड निर्मिती करण्याचे प्रशिक्षण व त्यांना रोजगार देण्याचा करार करण्यात आला आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.यावेळी मंचावर महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्षा मिना चौधरी, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, शिवचंद द्विवेदी, भय्याजी येरमे, रेणुका दुधे, एन.डी. जेम्स या संस्थेचे प्रमुख निलेश गुल्हाने आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी निलेश गुल्हाने म्हणाले, डायमंड उद्योगामध्ये मी गेले १५ वर्षे काम करीत आहे. डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र उभे करण्याची माझी तीव्र इच्छा होती. सुरत, मुंबईमध्ये हिऱ्यांचे व्यापारी मोठया संख्येने आहेत. मात्र त्यांना प्रशिक्षित तरुण मिळत ना
विदर्भातील पहिले डायमंड कटिंग प्रशिक्षण केंद्र बल्लारपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 9:40 AM
हिऱ्याला पैलू पाडून त्याला आकर्षक आकार देण्याचे प्रकार देणारे प्रशिक्षण केंद्र बल्लारपुरात साकार झाले आहे. या डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन रविवारी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.
ठळक मुद्देदरवर्षी एक हजार तरुणांना रोजगाराची हमी