आॅनलाईन लोकमतगिरगाव : येथून जवळच असलेल्या लेंडारी शिवारात काम करीत असणाऱ्या दोन शेतकऱ्यांना अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ पाहून दोघेही भांबावले. दरम्यान वाघाने या दोघांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. लाठ्याकाठ्या काढून आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.गोपाल थेरकर व सुरेश शेंडे अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे, चिखलगाव - गिरगाव मार्गावरील नाल्याजवळ दोन दिवसांपूर्वी दोन बछड्यासह वाघिणीने दर्शन दिले होते. नागरिकांची गर्दी उसळल्यानंतर वाघीण एका बछड्याला घेऊन पळून गेली. मात्र एक बछडा नाल्याजवळच होता. वनविभागाचे कर्मचारी व पोलीस त्या बछड्यावर पाळत ठेवून असतानाच तो रात्रीच्या सुमारास नाल्याजवळून गायब झाला. त्यामुळे या वाघिणीचा व बछड्याचा वन कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी गोपाल थेरकर व त्याचे सहकारी सुरेश शेंडे यांना लेंडारी परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. एका रानडुकराची या वाघाने शिकार केली होती. आणि त्यावर तो तिथे ताव मारत होता. मात्र दोन्ही शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने वाघाने या दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांनी लाठीचा वापर करून कसेबसे वाघाला हुसकावून लावले. त्यांच्या सतर्कतेमुळे दुर्दैवी घटना टळली. दोन दिवसांपूर्वी वाघीण व दोन बछडे, त्यानंतर शुक्रवारी जवळच्याच परिसरात पुन्हा वाघाचे दर्शन झाल्याने वाघीण, वाघ आणि बछडे एकत्रच असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वारंवार वाघाचे दर्शन होत असल्यामुळे झाडबोरी, नांदगाव, नांदेड, कन्हाळगाव, चिखलगाव या गावामध्ये दहशतीचे वातावरण आहे.‘तो’ बछडा वाघिणीकडे पोहचल्याचा दावागिरगाव मार्गावरील नाल्याजवळ असलेला बछडा बुधवारी रात्री वनविभाग व पोलीस यांची पाळत असतानाही अचानक गायब झाला होता. त्यानंतर वनविभागाने शोधमोहीम राबविली. दरम्यान हा बछडा वाघिणीकडे सुखरुप पोहचल्याचा दावा वनविभागाने केला आहे. परंतु वनविभागाचा हा दावा फोल असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
लेंडारी परिसरात वाघाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 11:51 PM
येथून जवळच असलेल्या लेंडारी शिवारात काम करीत असणाऱ्या दोन शेतकऱ्यांना अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ पाहून दोघेही भांबावले. दरम्यान वाघाने या दोघांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देसतर्कतेमुळे दुर्घटना टळली : दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न